एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telangana Election Result 2023 : केसीआर पुन्हा मुख्यमंत्री होणार? काँग्रेस सत्तापालट करणार? मतमोजणीला सुरुवात; भाजपची स्थिती नेमकी काय? तेलंगणाच्या निवडणूक निकालाचे सर्व अपडेट

Telangana Assembly Election Results 2023: महाराष्ट्राला लागूनच असलेल्या तेलंगाणाचंही भविष्य अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. तेलंगणामध्ये चंद्रशेखर रावांना धक्का बसणार का हे काही वेळातच स्पष्ट होईल.

LIVE

Key Events
Telangana Election Result 2023 : केसीआर पुन्हा मुख्यमंत्री होणार? काँग्रेस सत्तापालट करणार? मतमोजणीला सुरुवात; भाजपची स्थिती नेमकी काय? तेलंगणाच्या निवडणूक निकालाचे सर्व अपडेट

Background

मुंबई : तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 साठी (Telangana Vidhan Sabha Election 2023) आज 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं.  तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांच्या नेतृत्त्वातील भारत राष्ट्र समिती(Bharat Rashtra Samiti Telangana) सरकार सत्ता टिकवणार की काँग्रेस (Congress) बाजी मारणार  हे काही वेळात स्पष्ट होईल.  तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा आहेत. बहुमतासाठी 60 जागांची गरज आहे. 

महाराष्ट्राला लागूनच असलेल्या तेलंगाणाचंही भविष्य अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. 2014 साली स्थापन झालेल्या तेलंगाणामध्ये स्थापनेपासून भारत राष्ट्र समितीची (Bharat Rashtra Samiti) सत्ता आहे. आणि त्याच पक्षाचे के. चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्यांसाठीच्या योजना, उद्योगांना दिलेली सूट आणि मध्यम वर्गांमध्ये आकर्षक असा चेहरा असलेल्या केसीआर यांना पुन्हा सत्ता मिळेल असा विश्वास जाहीर केलं आहे. मात्र, त्यांना कडवं आव्हान दिलंय, काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी.  राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा फायदा कर्नाटकात झाला. तसाच फायदा तेलंगाणातही होईल असा विश्वास काँग्रेसला आहे. शिवाय, केसीआर यांच्याविरोधातली नाराजीही काँग्रेसच्या फायद्याची ठरु शकते. असं असलं तरी ओवैसींची एमआयएम आणि भाजपलाही विसरुन चालणार नाही. तुलनेनं दोन्ही पक्षांचं इथं अस्तित्व फार नाहीय. मात्र, यावेळी स्थिती बदलली आहे

14:11 PM (IST)  •  03 Dec 2023

Telangana Election Results 2023 : तेलंगणातील कामारेड्डीत काँग्रेसचे रेवंत रेड्डी आघाडीवर; केसीआर पडले मागे

Telangana Election Results 2023 : कामरेड्डी मतदारसंघातून तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी हे केसीआर यांच्यापेक्षा 1768 मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत 9 फेऱ्यांची मोजणी झाली असून, एकूण 19 फेऱ्यांची मोजणी बाकी आहे.

13:21 PM (IST)  •  03 Dec 2023

Telangana Election Results 2023 Reactions Live : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या म्हणाले,"अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागेल"

Telangana Election Results 2023 Reactions Live : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चार राज्यांच्या निकालाबाबत बोलताना सांगितले की,"आम्ही तेलंगणात आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आमच्या अंदाजानुसार आम्ही तेलंगणा आणि छत्तीसगड जिंकत आहोत. आम्हाला वाटले होते की तिथे मध्य प्रदेशातही स्पर्धा होईल. मात्र, अंतिम निकाल अद्याप आलेला नाही, त्यामुळे वाट पहावी लागेल."

13:12 PM (IST)  •  03 Dec 2023

Telangana Election Results 2023 Reactions Live : कर्नाटकचे डेप्युटी सीएम डीके शिवकुमार म्हणाले,"तेलंगणाच्या जनतेने केसीआरला उत्तर दिले आहे"

Telangana Election Results 2023 Reactions Live : तेलंगणा निवडणुकीच्या निकालांवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले,"राज्यातील जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. प्रगतीसाठी बदल झाला पाहिजे. रेवंत रेड्डी हे टीम लीडर आहेत. आमचा पक्ष मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेईल. ही निवडणूक सामूहिक नेतृत्वाखाली होणार आहे. हा निकाल आहे. मी केसीआर किंवा केटीआरवर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही, तेलंगणातील जनतेने त्यांना उत्तर दिले आहे.

12:39 PM (IST)  •  03 Dec 2023

Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेस आघाडीवर; केसीआर दुसऱ्या क्रमांकावर

Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेस आघाडीवर आहे. केसीआर दुसऱ्या क्रमांकावर तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार काँग्रेस आघाडीवर आहे.

काँग्रेस-65

BRS-39

भाजप-10

इतर-5 

12:08 PM (IST)  •  03 Dec 2023

Telangana Election Results 2023 : तीन फेऱ्यांमध्ये पुढे आहोत, आता चौथ्यासाठी मतमोजणी सुरू आहे : गोशामहलचे उमेदवार आणि भाजप नेते टी. राजा सिंह

Telangana Election Results 2023 : गोशामहल मतदारसंघातील भाजप नेते टी. राजा सिंह म्हणाले, "मी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत पुढे होतो, सध्या चौथ्या फेरीची मतमोजणी सुरू आहे."

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?Rohit Pawar On Ram Shinde | देवेंद्र फडणवीसांनी पैसे वाटलेत तरीही राम शिंदेंचा पराभव- रोहीत पवारSanjay Shirsat on Cabinet | भाजपकडे चांगली आकडेवारी त्यामुळे मंत्रिपद कमीजास्त होईल- संजय शिरसाटABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4PM 25 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
Embed widget