एक्स्प्लोर
Advertisement
जयललिता यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती चिंताजनक
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलबाहेर समर्थकांनी गर्दी केली आहे.
68 वर्षीय जयललिता यांना 22 सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून सुमारे दोन महिने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र रविवारी त्यांना रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आला.
हे वृत्त समजताच अपोलो रुग्णालयाबाहेर जयललितांच्या समर्थकांनी गर्दी केली आहे. चेन्नई रात्री पोलिसांचं पथकंही तैनात करण्यात आलं आहे.
एक्सपर्ट टीमकडून जयललिता यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती अपोलो रुग्णालयाने दिली आहे.
दरम्यान अपोलो रुग्णालयातच रात्री तामिळनाडू मंत्रिमंडळाची आपात्कालिन बैठकही पार पडली. तसंच तामिळनाडूचे प्रभारी राज्यपाल सी.विद्यासागर राव हे देखील रात्रीच चैन्नईत दाखल झाले आहेत. राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी तब्येतीबाबत चर्चा केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement