एक्स्प्लोर
ताजमहलचं सौंदर्य वर्षभरासाठी झाकलं जाणार!

नवी दिल्ली: जगभरातील पर्यटकांसाठी सौंदर्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहालचं सौंदर्य वर्षभरासाठी पर्यटकांना पाहाता येणार नाही. कारण आग्र्यातील ताजमहालच्या मुख्य घुमटावर मातीचा मुलामा चढवला जाणार आहे. संपूर्ण संगमरवरी असलेल्या ताजमहालला गेल्या अनेक वर्षांपासून पिवळेपणाची झाक चढली आहे. त्यामुळे हा पिवळेपणा कमी करण्यासाठी मातीचा मुलामा चढवण्याचा निर्णय पुरातत्व खात्यानं घेतलाय. एप्रिल 2015 पासून ही प्रक्रिया सुरु आहे. मुख्य घुमटावर 2 मिमी जाडीचा मातीचा मुलामा लावला जाणार आहे. हा थर सुकल्यानंतर नॉयलॉनच्या ब्रशने बाजूला काढून फिल्टर पाण्यानं धुतला जाणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























