एक्स्प्लोर

किडनी फेल, हॉस्पिटलच्या बेडवर, तरीही सुषमा स्वराज कार्यतत्पर

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज प्रकृती अस्वाथ्यामुळे दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहेत, पण त्यांचं काम मात्र अजूनही सुरुच आहे. अमेरिकन वंशाच्या महिलेवर बलात्कार झाल्याच्या वृत्तानंतर सुषमा स्वराज यांनी याची दखल घेतली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अहवाल देण्यासाठी सांगितल्याचं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं. https://twitter.com/SushmaSwaraj/status/804699416439308288 https://twitter.com/SushmaSwaraj/status/804699722434822144 https://twitter.com/SushmaSwaraj/status/804700094712811520 दिल्ली पोलिसांना दोषींना पकडण्याचे आदेश सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाली असून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु आहे. अमेरिकन महिलेवर बलात्कार झाल्याप्रकरणी त्यांनी ट्वीट केलं आहे की, "दिल्लीत मार्चमध्ये एका अमेरिकन पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याचं वृत्त मीडियात पाहिलं. मी दिल्लीच्या उपराज्यपालांसोबत याबाबत चर्चा केली आहे आणि दिल्ली पोलिसांना गुन्हा दाखल करुन दोषींना पकडण्याचे आदेश देण्यास सांगितलं आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही दोषींना सोडणार नाही, असा विश्वास पीडितेला देण्यासाठी सांगितलं आहे. https://twitter.com/SushmaSwaraj/status/804933599648620544 https://twitter.com/SushmaSwaraj/status/804933700118941696 https://twitter.com/SushmaSwaraj/status/804934233428873216 काय आहे प्रकरण? अमेरिकन महिलेने एका एनजीओच्या माध्यमातून दिल्ली पोलिसात तक्रार केली आहे. पाच जणांनी दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरातील हॉटलेमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपींमध्ये तिचा टुरिस्ट गाईडचाही समावेश होता. या घटनेनंतर महिला अमेरिकेत परतली. पण तिथे गेल्यावर तिला डिप्रेशन आलं. अखेर तिने तक्रार दाखल करण्याचा निश्चय केला. आजारी असूनही कामावर परिणाम नाही! रुग्णालयात असूनही सुषमा स्वराज त्यांच्या कामावर परिणाम होऊ देत नाहीत. सुषमा स्वराज कायम परराष्ट्र सचिवांच्या संपर्कात आहेत. इतकंच नाही तर महत्त्वाच्या फाईलसह नोट्सही त्या नजरेखालून घातल आहे. दरम्यान अमृतसरमध्ये होणाऱ्या 'हार्ट ऑफ एशिया' संमेलनात सुषमा स्वराज सहभागी होणार नाहीत. या संमेलनात सुषमा स्वराज यांच्याऐवजी अर्थमंत्री अरुण जेटली सहभागी होणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget