एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तरुणाची अजब विनंती आणि सुषमा स्वराज यांचं उत्तर
नवी दिल्ली : मोदी सरकारचे बरेच मंत्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. इतकंच नाही तर ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून ते सामान्य नागरिकांच्या अडचणीही दूर करतात. रेल्वेमंत्री सुरेश आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ट्विटरवर लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी ओळखले जातात. पण सुषमा स्वराज यांच्याकडे एका व्यक्तीने अशी विनंती केली की, जी वाचून स्वराज यांना हात जोडावे लागले.
ट्विटरवर वेंकट नावाच्या एका व्यक्तीने सुषमा स्वराज आणि रामविलास पासवान यांना मेंशन करुन रेफ्रिजरेटरशी संबंधित अडचण सोडवावी, अशी विनंती करत मदत मागितली.
https://twitter.com/M_VenkatM/status/742393863634100225
"सॅमसंग कंपनीने मला सदोष फ्रीज दिला आहे. मात्र कंपनी आता हा फ्रिज बदलण्यास तयार नाही. उलट फ्रीज दुरुस्त करावा यासाठी कंपनी दबाव टाकत आहे," असं ट्वीट वेंकटने केलं. इतकंच नाही तर त्याने सीरियल नंबरही ट्वीटमध्ये मेंशन केला होता.
https://twitter.com/SushmaSwaraj/status/742394908145655808
या ट्वीटला उत्तर देताना सुषमा स्वराज यांनी लिहिलं की, "मी रेफ्रिजरेटरशी संबंधित अडचण दूर करु शकत नाही. कारण मी माणसांच्या समस्या दूर करण्यात व्यस्त आहे."
खरंतर ट्विटरवर अनेक जण त्यांच्या अडचणींबाबत कंपनीसह मंत्र्यांनाही मेंशन करतात, जेणेकरुन कंपनी काही कारवाई करेल. पण मंत्री बऱ्याचदा अशा ट्वीटकडे दुर्लक्ष करतात. मात्र परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ट्विटरवर नागरिकांच्या अडचणी समजून घेतात आणि त्यावर कारवाईही करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement