एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राफेल, शबरीमाला प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार
सर्वोच्च न्यायालय आज 2 महत्वपूर्ण प्रकरणांवर निर्णय देणार आहे. कथित राफेल घोटाळा आणि शबरीमाला मंदिरातील महिलांचा प्रवेश वाद यावरील फेरविचार याचिका यावर न्यायालय आज सुनावणी घेणार आहे.
नवी दिल्ली - कथित राफेल घोटाळा आणि शबरीमाला मंदिरातील महिलांचा प्रवेश वाद या 2 महत्वपूर्ण याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. या दोन्ही प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. येत्या 17 नोव्हेंबरला सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होत आहे, त्याआधी या प्रकरणांवर ते निर्णय देणार आहेत.
14 डिसेंबर 2018 ला राफेल खरेदी प्रकरणात कोणतीही अनियमितता झाली नाही, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. यावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती. तर, शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील स्त्रीयांना प्रवेश देण्याच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती. यावरही न्यायालय निर्णय देणार आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली असलेले खंडपीठ यावर निर्णय देणार आहे. राफेल प्रकरणी सर्व याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने परखड मतं नोंदवली आहेत. राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी यापूर्वीच फेटाळून लावली होती. त्यानंतर याप्रकरणी काही नवी तथ्ये समोर आल्यानंतर फेरविचार याचिका दाखल करुन घेतली होती. आता या प्रकरणावरही न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील स्त्रीयांना प्रवेशास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. या निर्णयाला अनेक धार्मिक संघटनांनी विरोध केला होता. हे परंपरांचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी फेरविचार याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
राफेल व्यवहार मनोहर पर्रिकरांना मान्य नव्हता म्हणूनच त्यांनी संरक्षण मंत्रीपद सोडले, शरद पवारांचा गौप्यस्फोट
शाह-गडकरी जोडीच्या खेळीने भाजप सरकार वाचलं, गोव्यात कसं बनलं सरकार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement