एक्स्प्लोर

शाह-गडकरी जोडीच्या खेळीने भाजप सरकार वाचलं, गोव्यात कसं बनलं सरकार?

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (17 मार्च) निधन झालं. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने वयाच्या 63 व्या वर्षी पणजीतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर राज्यात सत्ता बनवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवण्यात आली आणि गडकरींनी हे काम योग्यरित्या पूर्णही केलं. पर्रिकरांच्या निधनाचं वृत्त समजताच नितीन गडकरी रात्री उशिरा दोन वाजता गोव्याच्या सिडाडे गोवा हॉटेलमध्ये पोहोचले. इथे पोहोचताच नितीन गडकरी सर्वात आधी आपले मित्रपक्ष एमजीपी, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि तीन अपक्ष आमदारांना भेटले. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत नितीन गडकरींनी पक्षाची भूमिका त्यांच्यासमोर मांडून पाठिंबा मागितला. पण सहा आमदारांचा एक गट बनवलेल्या विजय सरदेसाई यांना माहित होतं की, आपल्याकडे सरकारचा रिमोट कंट्रोल आहे. भाजपवर दबाव टाकण्यासाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या सुदिन ढवळीकर यांनीही विजय सरदेसाई यांची साथ दिली. प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री, रात्री दोन वाजता घेतली शपथ सुरुवातीला दोघांनीही भाजपने सूचवलेल्या श्रीपाद नाईक यांच्या नावाला विरोध केला आणि उलट भाजपसमोरच मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. ही मागणी भाजपला मान्य नव्हती. साहजिकच दोघांनाही माहित होतं की, भाजप त्यांचा प्रस्ताव स्वीकारणार नाही. परंतु भाजपवर जास्तीत जास्त दबाव बनवून आपल्या फायद्यासाठी त्यांनी ही खेळी रचली होती. यानंतर सोमवारी सकाळी भाजपने विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांचं नाव पुढे केलं. नितीन गडकरी सातत्याने विजय सरदेसाई आणि सुदिन ढवळीकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. पण दोघेही भाजपसमोर मोठ्या मागण्या ठेवत होते. यानंतर नाराज नितीन गडकरींनी सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत थेट सांगितलं की, सहमती झाली नाही तर भाजप विधानसभा बरखास्त करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही. VIDEO | प्रमोद सावंत गोव्याचे नवे मुख्यमंत्री  गडकरींच्या या इशाऱ्यानंतर दोन्ही पक्षांचा विरोध काहीसा मावळला. पण भाजपसमोर नवा प्रस्ताव ठेवण्यासाठी सोमवारी दुपारी पुन्हा एमजीपी आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांच्यात बैठक झाली. या बैठकीत प्रमोद सावंत यांच्या नावावर तर सहमती झाली, पण त्यांनी स्वत:साठी उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केली. तसंच गृहमंत्रालयासारखं महत्त्वाचं खातंही मागितलं. प्रमोद सावंत गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी, पर्रिकरांच्या निधनानंतर काही तासातच शपथविधी भाजपला राज्यात दोन उपमुख्यमंत्री नको होते. पण सहयोगी दल यावर अडून बसले होते. याचदरम्यान नितीन गडकरींना भाजप अध्यक्ष अमित शाह यांची साथ मिळाली. शाह आणि गडकरी यांनी रणनीती बनवली. त्यांनी विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव देऊन सहा आमदार आपल्या बाजूला घेतले. तसंच एमजीपीवर दबाव टाकण्यासाठी बाबू आझगावकर आणि दीपक पावसकर या दोन आमदारांच्याशी संपर्क करण्यास सुरुवात केली. याआधीही भाजपमध्ये सामील होण्यासाठी दोघांशी भाजपशी संपर्क केला होता. एमजीपीच्या एकूण तीन आमदारांपैकी दोन जण पक्ष सोडून जरी गेले असते तर 'अँटी डिफेक्शन' लागू झालं नसतं. असं केल्याने सुदिन ढवळीकरांवर दबाव वाढला. या चालीमुळे सुदिन ढवळीकर नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी धावत आले. रात्री दहाच्या सुमारास सुदिन सिडाडे गोवा हॉटेलमध्ये पोहोचले. नितीन गडकरी यांच्यासोबत काही काळ चर्चा झाली. मग गडकरींनी एमजीपीचे दोन आमदार बाबू आझगावकर आणि दीपक पावसकर, भाजपचे सर्व आमदार आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई, तीन अपक्ष आमदारांना भेटींचं निमंत्रण दिलं. रात्री साडे अकराच्या सुमारास बैठक सुरु झाली. यानंतर एक तासाने नितीन गडकरींनी घोषणा केली की, गोव्यात भाजप सत्ता स्थापन करणार आहे. मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, अखेरच्या निरोपासाठी जनसागर लोटला भाजपने असं करुन गोवा फॉरवर्ड पक्षावरही दबाव बनवला आणि सोबतच विजय सरदेसाई गटाचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांना संपर्क करुन भेटण्यासाठी बोलावलं. भाजपला सत्ता स्थापन करायची होती आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना निवडणूक नको होती. अशा परिस्थितीत भाजपने दोघांना उपमुख्यमंत्रीपद देऊन महत्त्वाचे विभाग आपल्याकडे ठेवले आणि हे युती बनली. प्रमोद सावंत यांच्या नावावर सहमती झाली आणि रात्री 12.30 च्या सुमारास सर्व आमदार शपथविधीसाठी राज भवनात दाखल झाले. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी रात्री उशिरा 1.45 वाजता प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तर इतर 11 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पर्रिकरांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग आणि गोवा विधानसभा जागांचं गणित! सुधीन ढवळीकर (एमजीपीचे आमदार) विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख) मनोह आझगावकर (एमजीपीचे आमदार) रोहन खुंटे (अपक्ष आमदार) गोविंद गावडे (अपक्ष आमदार) विनोद पालयेकर (गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार) जयेश साळगावकर (गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार) मौविन गॉडिन्हो (भाजपचे आमदार) विश्वजीत राणे (भाजपचे आमदार) मिलिंद नाईक (भाजपचे आमदार) निलेश कॅब्राल (भाजपचे आमदार) संबंधित बातम्या लढवय्या नेता हरपला : पर्रिकरांचं शिक्षण, राजकारण, धाडसी निर्णय आणि आजारपण लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय   गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने शोककळा, लढवय्या नेत्याला मान्यवरांकडून श्रद्धांजली 'सर्जिकल स्ट्राईक' ते 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा मनोहर पर्रिकरांनी सुचवलं केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर, मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवावर संध्याकाळी 5 वाजता होणार अंत्यंसस्कार मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीन गडकरी गोव्यात दाखल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget