एक्स्प्लोर

राफेल व्यवहार मनोहर पर्रिकरांना मान्य नव्हता म्हणूनच त्यांनी संरक्षण मंत्रीपद सोडले, शरद पवारांचा गौप्यस्फोट

सैन्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करु नये. हे सर्वांनी पाळलं परंतु भाजप सरकार त्याला अपवाद आहे. ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी बोलतात. पण सैन्याचा वापर कोणत्याही पक्षाने राजकीय फायद्यासाठी करु नये असे पवार यावेळी म्हणाले.

कोल्हापूर :  राफेल व्यवहार प्रक्रिया मनोहर पर्रिकर यांना मान्य नव्हती म्हणूनच संरक्षण मंत्रीपद सोडून ते गोव्यात आले, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी कोल्हापुरात केला. राहुल गांधीनंतर आता प्रथमच शरद पवार मनोहर पर्रिकर यांच्याबाबत बोलले आहेत. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सैन्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करु नये यावेळी पवार यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. नरेंद्र मोदींनी कोणतीच आश्वासने पाळली नाहीत. लोकांची नाराजी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने होत आहे. देशातील संस्थांवर हल्ला होत आहे. संस्था राजकीय कामासाठी वापरतात, असा आरोप त्यांनी केला.  शिवाय सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश प्रेस घेतात ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सैन्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न कोणी करु नये. हे सर्वांनी पाळलं परंतु भाजप सरकार त्याला अपवाद आहे. ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी बोलतात. पण सैन्याचा वापर कोणत्याही पक्षाने राजकीय फायद्यासाठी करु नये असे पवार यावेळी म्हणाले. राज ठाकरेंच्या सभांचे कौतुक पवार यावेळी म्हणाले, राज ठाकरे यांचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. मोदी शहा घातक आहेत, हेच ते सर्वांना सांगत आहे. जे चुकीचं चाललंय ते राज ठाकरे प्रभावीपणे मांडत आहेत. हे मांडत असताना ते आपल्या भाषणात उदाहरणांसह दाखवत आहेत आणि ते अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यांच्या सभांचा फायदा होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे आणि आम्ही निवडणुकीत एकत्र नाही पण राज्य चुकीच्या लोकांच्या हातातून काढून घेण्यासाठी सर्वांची मदत घेणार असल्याचे पवार म्हणाले. मोदींनी निश्चित काय केलं हे त्यांना माहिती नाही. मोदींना गांभीर्याने घेण्याची गरज नाही त्यामुळं लोकं बदल करण्याचा मनस्थितीत आहेत. भाजपा आणि सेनेचं सरकार नको अशी लोकांची मनस्थिती आहे, असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत जे सातत्य होतं ते आज राहीलं नसल्याचंही  शरद पवार यावेळी म्हणाले. शिवाय पहिल्या टप्प्यातील मतदानात काँग्रेस-राष्ट्रवादी ला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Embed widget