एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अनेक गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या सुपर K9 अतिरिक्त एसपी टिंकीने घेतला अंतिम श्वास, पोलीसांकडून मानवंदना

पोलीसांना तपास लावण्यात अशक्यप्राय वाटणाऱ्या तब्बल 47 प्रकरणांचा तपास लावण्यास टिंकीने आपले कौशल्य पणाला लावले होते.मुझ्झफ्फरनगर पोलीसांचा अविभाज्य भाग असणाऱ्या टिंकीला गेल्या काही दिवसांपासून पोटाचा विकार जडला होता आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

मुझ्झफ्फरनगर (उत्तर प्रदेश): मुझ्झफ्फरनगर पोलीसांचा एका अविभाज्य घटक असलेल्या टिंकी या आठ वर्षाच्या श्वानाचा मृत्यू झाला आहे. गेले काही दिवस तिची तब्येत खूपच खालावली होती आणि तिची काळजी घ्यायला मुझ्झफ्फरनगर पोलीस सक्षम नव्हते. काही दिवसानंतर तिच्या पोटाच्या विकाराने उग्र रुप धारण केले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मंगळवारी मुझ्झफ्फरनगर पोलीसांनी टिंकीचे अंतिम संस्कार पार पाडले. त्यापूर्वी तिला मानवंदना दिली.

टिंकीने 2014 मध्ये कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात काम सुरु केल्यानंतर आपल्या कामाने अनेकांची मने जिंकली. आपल्या कामाबाबत सजग असलेल्या टिंकीने तब्बल 47 अशा गुन्हांचा छडा लावला ज्यांचा शोध लावणे पोलीसांसाठी जवळपास अशक्यप्राय झालं होतं. कसलाही सुगावा मिळत नसलेल्या अशा गुन्ह्यांना ब्लाईंड क्राईम म्हणतात, अशा ब्लाईंड क्राईमची उकल करण्यात तिचा हातखंडा होता.  अशा प्रकारच्या अप्रतिम कामगिरीमुळे टिंकीला केवळ 6 वर्षातच 6 प्रमोशन मिळाली होती आणि या जोरावर तिने अतिरिक्त एसपी अर्थात अतिरिक्त पोलिस अधिक्षकपदापर्यंत मजल मारली होती

ज्या गुन्हात काहीच पुरावा हाती लागत नाही, ज्याचा तपास पोलीसांच्यासाठी अशक्यप्राय होत होता अशा तपासामध्ये टिंकीने आपले कौशल्य लावले आणि त्या प्रकरणांचा छडा लावला. जेव्हा जेव्हा पोलीसांच्या कौशल्याचा प्रश्न निर्माण होत होता त्यावेळी टिंकीने तिच्या अफाट बुद्धीकौशल्याने अनेकांना आश्चर्यचकित केलं होतं.

ग्वाल्हेर येथील बीएसएफच्या नॅशनल डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत असलेली टिंकी ही जर्मन शेफर्ड श्वान मुझ्झफ्फरनगर पोलीस व्यवस्थेचा एक भाग बनली. स्निफर डॉग म्हणून तिला पहिली पोस्टिंग मिळाली. मुझ्झफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक यादव तिच्याबाबत बोलताना म्हणाले की, "टिंकी ही अत्यंत हुशार, धाडसी आणि चाणाक्ष होती. तिने आतापर्यंत अशक्यप्राय अशा 47 प्रकरणांचा छडा लावला आहे. मंगळवारी मुझ्झफ्फरनगर पोलीसांनी टिंकीच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात आपल्या आवडत्या सदस्याला शेवटचा निरोप दिला."

"टिंकीने आतापर्यंत ज्या खून, चोरी आणि दरोड्यांच्या प्रकरणांचा तपास केला, ती प्रकरणे उघडकीस आणणे अत्यंत अवघड अशी होती. अशाच एका प्रकरणात एक व्यक्ती दहा दिवसांपासून बेपत्ता होती. त्याचा माग काढण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. त्यावेळी टिंकीने तिचे सर्व कौशल्य पणाला लावून त्या व्यक्तीचा मार्ग काढला. त्या ठिकाणी तो व्यक्ती मृत अवस्थेत सापडला होता" असेही एसएसपी यादव यांनी सांगितले.

टिंकीला पोटाचा विकार जडल्यापासून तिच्यावर मेरठ व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तेव्हापासूनच तिची काळजी घेणारे कॉन्स्टेबल महेश कुमार हे तिच्या प्रकृतीबद्दल काळजीत होते. सोमवारी रात्री त्यांना ज्यावेळी समजले की टिंकी आता बरी होऊ शकत नाही त्यावेळी महेश कुमारांना अश्रू अनावर झाले. "मी तिच्यासोबत गेली 6 वर्षे काम करतोय, तिची काळजी घेतोय. कामाव्यतिरिक्त तिचे वागणे हे मैत्रीपूर्ण होते. तिला लहान मुलांसोबत खेळायला खूप आवडायचे" असे महेश कुमारा यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या:

कोल्हापूरकरांचं पशूप्रेम! श्वानाचं निधन झाल्यानंतर वर्षश्राद्ध घालत संपूर्ण गावाला जेवण

'मन की बात'मध्ये बीडच्या 'रॉकी'चा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी भावूक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget