एक्स्प्लोर
13 राज्यात वादळी पावसाचा अंदाज, हरियाणात शाळांना सुट्टी
देशातील 13 राज्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
नवी दिल्ली: देशातील 13 राज्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
पूर्वेकडील राज्ये आणि उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश , हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये खबदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे हरियाणा सरकारने खासगी आणि सरकारी शाळांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर केली आहे.
चारच दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशच्या पश्चिम भागात धुळीच्या वादळानं 127 हून अधिक जणांचा जीव घेतला.
कोणत्या कोणत्या राज्यांना अलर्ट?
हवामान विभागाने जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना अलर्ट जारी केला आहे.
जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात वादळी वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज आहे. पंजाबमध्ये पुढील 48 ते 72 तासात हलका पाऊस आणि वादळ येऊ शकतं.
तिकडे राजस्थानमध्ये धुळीचं वादळ येण्याची चिन्हं आहेत.
दरम्यान, नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही मात्र काळजी घ्या, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
संबंधित बातम्या
राजस्थान, उत्तर प्रदेशात धुळीचं वादळ, 86 मृत्यूमुखी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement