एक्स्प्लोर
जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला स्पाईसजेट, 100 वैमानिकांसह शेकडो कर्मचाऱ्यांना दिली नोकरी
जेटच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला स्पाईसजेट धावून आलं आहे. जेट एअरवेजच्या 100 वैमानिकांसह 500 कर्मचाऱ्यांना स्पाईसजेटने नोकरी दिली आहे. भविष्यात देखील जेटच्या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची तयारी असल्याचे स्पाईसजेटकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई : बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. मात्र आता जेटच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला स्पाईसजेट धावून आलं आहे. जेट एअरवेजच्या 100 वैमानिकांसह 500 कर्मचाऱ्यांना स्पाईसजेटने नोकरी दिली आहे. भविष्यात देखील जेटच्या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याची तयारी असल्याचे स्पाईसजेटकडून सांगण्यात आले आहे.
स्पाईसजेट कंपनी येणाऱ्या काळात अधिक विमानं आणि नव्या मार्गांवर सेवा सुरु करणार आहे. या कंपनीने २७ नवी विमानं येणार असल्याचं सांगितलं आहे. जेट एअरवेजने सेवा बंद झाल्यानंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सेवांची संख्या कमी झाली आहे. ही क्षमता भरून काढण्यासाठी स्पाईसजेट काम करणार असल्याचे सांगितले आहे.
स्पाईसजेटच्या भरतीमध्ये जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना प्राथमिकता दिली जात असल्याचे स्पाईसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले.
बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. यामुळे जेट एअरवेज कर्मचाऱ्यांचा जेट एअरवेजच्या ऑफिसबाहेर आंदोलन देखील केले होते. 17 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो कर्मचारी रस्त्यावर आले आहेत.
जेट एअरवेज सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने बँकांकडे 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतू बँकांकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने 17 एप्रिलच्या रात्री 12 नंतर जेटची विमानसेवा बंद करण्यात आली.
जेट एअरवेजच्या आर्थिक अडचणी वाढल्यानंतर 25 मार्च रोजी संस्थापक नरेश गोयल यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच जेटची आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. जेट एअरवेज बंद पडल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement