एक्स्प्लोर
केजरीवाल सरकारला आणखी एक झटका, आमदाराला अटक
नवी दिल्ली: आम आदमी पार्टीच्या एका महिला कार्यकर्त्याच्या आत्महत्येप्रकरणी नरेलामधून आम आदमी पार्टीचे आमदार शरद चौहान यांना अटक करण्याच आले आहे. दिल्ली गुन्हे अन्वेषण विभाग गेल्या तीन दिवासांपासून चौहान यांची चौकशी करत होती. आप कार्यकर्ता सोनीची आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी आमदारांचे निकटवर्तीय रमेश भारद्वाज यांनी सोनीला त्रास दिल्याचा आरोप केला होता. या त्रासाला कंटाळून सोनीने आत्महत्या केली होती.
या प्रकरणी आमदार शरद चौहान यांच्यासह नरेला पोलीस ठाण्याशी संबंधित माजी आयओ यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. सोनीच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी शरद चौहान यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होते. तसेच महिलेने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून भारद्वाजवर गंभीर आरोप लावले होते.
दरम्यान ,या अटक प्रकरणानंतर आप नेते आशुतोष यांनी ट्विटरवरून या प्रकरणी मोदी सरकारला दोष दिला आहे. आशुतोष यांनी आपल्या ट्विटमध्ये, ''आणखी एक आप आमदाराल अटक, मोदी वेडे झाले आहेत का? कि त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे? जर पंतप्रधान नरेंद्र मोदी राग आणि द्वेषाने काम करणार असतील, तर देश सुरक्षित कसा राहिल?'' असा प्रश्न उपस्थित केला आहे.
Another AAP MLA arrested.Has Modi gone mad?Has he lost his mental balance? If PM acts with such anger/vengeance then is country safe!
— ashutosh (@ashutosh83B) July 31, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement