एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Corona Virus | कोरोनाग्रस्त चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं, मित्र देशाच्या 5 नागरिकांचाही समावेश
गेल्या महिन्यापासून चीनमध्ये अडकून पडलेल्या 119 भारतीयांची सुटका अखेर झाली. भारतीय वायुसनेच्या विमानाने त्यांना सुरक्षित भारतात आणलं आहे.
![Corona Virus | कोरोनाग्रस्त चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं, मित्र देशाच्या 5 नागरिकांचाही समावेश iafs c 17 globemaster leaves from china after rescue mission Corona Virus | कोरोनाग्रस्त चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं, मित्र देशाच्या 5 नागरिकांचाही समावेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/27140855/corona.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या चीनच्या वुहान येथून 119 भारतीय आणि पाच परदेशी नागरिकांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान दिल्लीला आज परतले. चीनला 15 टन साहित्य घेऊन हे विमान बुधवारी रवाना झाले होते. गेल्या 28 दिवसांत कोरोना विषाणू बाधित भागातून भारताने 850हून अधिक नागरिकांना सुरक्षित भारतात आणले आहे. भारताने मित्र देशांच्याही 45 हून अधिक नागरिकांना बाहेर काढले आहे.
कोरोना संकटात सापडलेल्या चीनसाठी वैद्यकीय उपकरणे आणि मदत पुरवठा घेऊन भारतीय वायुसेनेचे सी 17 विशेष विमान वुहानला पोहोचले. संकट काळात चीनला दिलेला मदतीचा हात हे भारतीय एकजूटतेचे दर्शन असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. सी -17 ग्लोबमास्टर लष्करी विमान चीनमध्ये 15 टन वैद्यकीय साहित्य होते. ज्यात मास्क, हातमोजे आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. चीनमध्ये आतापर्यंत या विषाणूमुळे 2,700 लोकांचा मृत्यू झालाय. तर 80,000 लोक बाधित झाल्याची माहिती आहे.
Corona Virus | कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये 2,592 लोकांचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 फेब्रुवारीला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना पत्र लिहून कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी मदत देण्याची ऑफर दिली होती. सोबतच भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यास परवानगी देऊन भारताला सहाय्य केल्याबद्दल चीनचे आभार मानले. यानंतर चीनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राणघातक कोराना विषाणूचा सामना करण्यासाठी मदत व सहकार्याच्या ऑफरचे आभार मानले.
यापूर्वी विशेष विमानातून 647 भारतीय नागरिकांची सुटका -
भारताने विशेष विमान पाठवून 25 फेब्रुवारीला 647 भारतीय नागरिक आणि मालदिवच्या सात नागरिकांना चीनमधून मायदेशी आणलं आहे. चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ आयोग (एनएचसी)ने सांगितलं की, 31 प्रांतात रविवारी कोरोनाचे 409 रूग्ण समोर आले आहेत. तसेच 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. एनएचसीने सांगितलं की, चीनमध्ये एकूण 80,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 150 पैकी 149 लोकांचा मृत्यू हुबेई प्रांतात झाला आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू हैनान प्रांतात झाला आहे. एनएचसीने असा दावा केला आहे की, कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये घट होत आहे.
Special Report | कोरोना व्हायरसचा कापूस उत्पादकांना मोठा फटका, कवडीमोल भावात कापसाची विक्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)