एक्स्प्लोर

नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह

नाशिकमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असून शनिवारी तज्ञ डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते पुण्याला पाठवण्यात आले आहेत. लवकरच अहवाल प्राप्त होताच त्यानूसार उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

नाशिक : कोरोना व्हायरसचा चीनमध्ये कहर पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. या भयंकर अशा कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. कोरोनाची लक्षणे नकारात्मक आलेल्या 36 वर्षीय रुग्णाचा केरळमध्ये मृत्यू झाल्याने भारतात देखिल खळबळ उडाली आहे. यातच आता नाशिकमध्ये देखिल कोरोना सदृश्य रुग्ण आढळला होता. त्याच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना कक्षात उपचार करण्यात आले. या तरुणाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय होता मात्र चाचण्यांनंतर समोर आलेल्या रिपोर्टनुसार त्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचं समोर आलं आहे. मूळचा चंद्रपूरचा असणारा हा 24 वर्षीय तरुण ईटलीमध्ये शिक्षण घेत असून तो काही दिवसांपूर्वी भारतात परतला. यावेळी मुंबई विमानतळावर त्याची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली होती. पण त्यावेळी तो निरोगी असल्याचं स्पष्ट झाल होतं. तीन दिवसांपूर्वी नाशिकला तो त्याच्या बहिणीकडे आला असता त्याला सर्दी आणि घसादुखीचा त्रास जाणवू लागताच कोरोनाच्या संशयावरून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल तज्ञ डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते पुण्याला पाठवण्यात आले आहेत. लवकरच अहवाल प्राप्त होताच त्यानूसार उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित क्षेत्रातून आठ नागरिक दाखल झाले आहेत. कोरोना व्हायरस म्हणजे काय? कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्याई व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. लक्षणे कोणती आहेत ? कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात. काय काळजी घ्याल? तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या. संबंधित बातम्या

कोरोना व्हायरसचा बीडमधील पोल्ट्री व्यवसायाला फटका, अफवांमुळे ग्राहकांची पाठ फिरवली

चीनमध्ये अडकलेल्या रत्नागिरीमधील तीन विद्यार्थिनी सुखरूप

Corona Virus | कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये 2,592 लोकांचा मृत्यू

कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Malhar Certificate Jejuri | मल्हार सर्टिफिकेट नावाला जेजुरी ग्रामस्थांचा विरोध, गावकरी म्हणाले..Special Rpeort Prashant Koratkar : पोलिसांचं सहकार्य? 'चिल्लर' प्रशांत कोरटकर सापडत कसा नााही?Nagpur Rada Loss : नागपूर राड्याचं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करणार, फडणवीसांचा थेट इशाराSpecial Report Sharad Pawar : जयंत पाटील अजितदादांची भेट, संजय राऊतांचा थयथयाट, नेमकं शिजतंय काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
Embed widget