(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#CoronaVirus देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला व्यापलं असताना भारतातही आता दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. देशात यापूर्वीही अनेक रुग्णांवर संशयित कोरोना रुग्ण म्हणून उपचार करण्यात आले मात्र त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं.
नवी दिल्ली : भारतात पहिली कोरोना व्हायरस डिटेक्ट झालेली पॉझिटिव्ह केस समोर आली आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण हा एक नसून तेलंगणा आणि नवी दिल्ली अशा दोन ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत, चाचणीमध्ये दोनही रुग्णांचे रिपोर्ट्स कोरोनाच्या लक्षणांशी मिळते-जुळते असल्याचं दिसून आलं.
तेलंगणा राज्याचे आरोग्यमंत्री इटेला राजेंदर यांनी राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली आहे. यातील एक रुग्ण इटलीहून तर दुसरा दुबईवरून भारतात आला असल्याचं समजत आहे. कोरोना व्हायरसवर तो बरा करण्यासाठी अद्यापही उपाय शोधला गेलेला नाही, त्यासाठी कोणत्याही अधिकृत उपचाराचा शोध लागला नाही. यापूर्वीही भारतात तीन संशयित रुग्ण आढळले होते, हे रुग्ण केरळ आणि पश्चिम बंगालमधील होते. मात्र तिघांचेही रिपोर्ट्स निगेटिव्ह आले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. भारताच्या आरोग्यमंत्रालयाने या दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबद्दल अधिकृत माहिती दिली आहे.
Corona Virus | केरळमध्ये कोरोनाचा तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला | ABP Majha
कोरोना व्हायरसचा म्हणजेच कोविड-19चा एक रुग्ण नवी दिल्लीत तर एक रुग्ण तेलंगणामध्ये आढळला आहे. दिल्लीतील रुग्ण इटलीवरून आला असून तेलंगणातील रुग्ण दुबईतून आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने ट्वीट करत दिली आहे. दोनही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
जगभरात तब्बल 86 हजारांहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राष्ट्रीय स्वास्थ्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार चायनाच्या हुवेई प्रांता कोरोनाचा परिणाम सर्वाधिक झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना याच हुवेईच्या राजधानीतून म्हणजेच वुहानमधून पसरायला लागला. चायनामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 2870 जणांचा मृत्यू झाला आहे. याचा परिणाम फक्त आरोग्यच नाही तर शेअर्स आणि व्यापारावरही झाला असल्याचं दिसत आहे. अगदी सोनं खरेदीवरही याचा परिणाम होताना दिसत आहे.
मांसाहार विक्रेत्यांनाही कोरोनाचा फटका
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचा फटका चिकन आणि मटण क्षेत्रालाही बसला. आपल्यालाही कोरोना व्हायरस होईल या भीतीने अनेकांनी चिकन, मटण खाणे वर्ज्य केले. परिणामी मागील काही दिवसांपासून या क्षेत्राला करोडो रुपयांचा फटका बसला. परंतु, सरकारने मागील काही दिवसांपासून याविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली असून त्याचे सकारात्मक परीणामही आता पाहण्यास मिळत आहेत. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका चिकन फेस्टिव्हलला नागरिकांनी प्रचंड गर्दी केलीय. या फेस्टिव्हलमध्ये चिकन बिर्याणी आणि चिकनच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलीय. येथील पदार्थ खाण्यासाठी नागरिकांनी तब्बल एक किमीहुन अधिक मोठी रांग लावली होती.EXPLAINER VIDEO | कोरोना व्हायरसचं सध्याचं अपडेट काय? | बातमीच्या पलीकडे | ABP Majha
#CoronaVirus | नाशिकमधील कोरोना संशयित निगेटिव्ह, वैद्यकीय चाचणीत कोरोनाची लक्षणं नसल्याचं सिद्ध
EXPLAINER VIDEO | कोरोना व्हायरस नेमका कसा पसरला? तुम्ही काळजी कशी घ्याल? बातमीच्या पलीकडे