एक्स्प्लोर
गोव्यात शिवसेनेचं ‘डरकाळी’ आंदोलन
सरकारच्या विरोधात ढोल आणि ताशे वाजवून यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

गोवा : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत गोव्यात भाजप सरकारमध्ये दम उरला नाही. सर्वसामान्य लोक हैराण झाले असून लोकसभा निवडणुकीत लोक भाजपला त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल करत गोवा शिवसेनेने पणजी बस स्थानकावर ‘डरकाळी’ आंदोलन केले.
भाजप सरकारच्या काळात गोव्यात अनागोंदी माजली असून सरकारच्या धोरणांना होणारा विरोध वाढत आहे, असे शिवसेनेच्या गोव्यातील नेत्यांचे म्हणणे आहे.
खाण प्रश्न, कॅसिनो समस्या, रोजगार निर्मिती, भाषा माध्यम यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून प्रादेशिक आराखडा आणि पीडीएच्या माध्यमातून गोवा विकायला काढण्याचा भाजप सरकारचा कुटिल डाव असून जनतेमध्ये जागृती करण्यासाठी शिवसेनेने डरकाळी आंदोलन केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, सरकारच्या विरोधात ढोल आणि ताशे वाजवून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
