एक्स्प्लोर
शिवराजसिंह चौहान अनिश्चित काळासाठीचं उपोषण दुसऱ्या दिवशीच संपवणार?

भोपाळ : मध्य प्रदेशात शांतता नांदावी, यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल अनिश्चित काळासाठी उपोषणाला सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या दिवशी उपोषणातून माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंदसौरमध्ये पोलिसांच्या गोळाबार मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी काल मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन चर्चा केली. मृतांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिवराजसिंह चौहान हे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “पीडित कुटुंबीय इतक्या मोठ्या दु:खातही माझ्याशी बोलले. त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती करुन आपल्या गावामध्ये बोलावले आहे.”
शिवराजसिंह चौहान आज उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनिश्चित काळासाठी सुरु केलेलं उपोषण दुसऱ्याच दिवशी संपणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशात कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. पोलिसांच्या गोळीबारात आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरीही मध्य प्रदेशातील आंदोलन थांबायचं नाव घेत नाही.
मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरु केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
