एक्स्प्लोर

Instagram Pay : तुम्हालाही आहे इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करण्याची आवड? आता प्रत्येक रील, पोस्टमागे कमवता येणार हजारो रुपये

Shark Tank India : इन्स्टाग्रामवरुन कमाईसाठी युजर्स बरेच रील्स आणि व्हिडीओज अपलोड करत असतात. आता इन्स्टाग्रामवरुन कमाईचा असाच एक मार्ग Shark Tank India मध्ये आलेल्या Wyld प्लॅटफॉर्मच्या संस्थापकांनी सांगितला आहे, पाहूया.

Shark Tank India : सोशल मीडिया ॲप इन्स्टाग्रामची लोकप्रियता तर सर्वांनाच ठाऊक आहे. युट्युबप्रमाणे इन्स्टाग्रामवरुन (Instagram) देखील लोक लाखो रुपये कमवत आहेत. इन्स्टाग्रामवर कमाई करण्यासाठी अनेक फॉलोअर्सची आवश्यकता असते, ज्यासाठी लोक बरीच मेहनत घेत असतात. आता तुम्हीही केवळ हजार फॉलोअर्स असताना इन्स्टाग्रामवरुन कमाई करू शकतात, यासाठीचा सर्वात सोपा मार्ग आज जाणून घेऊया. शार्क टँक इंडिया शोमध्ये WYLD नावाचा स्टार्टअप समोर आला, जो तुम्हाला इन्स्टाग्राम पोस्ट, व्हिडीओसाठी चांगला कॅशबॅक देत आहे. 

WYLD नेमकं आहे तरी काय?

WYLD नावाच्या स्टार्टअपने शार्क टँक इंडिया शोमध्ये प्रेझेंटेशन दिलं. WYLD हे एक शॉपिंग कार्ड आहे, जे व्हिसावर आधारित आहे. याचं व्हर्च्युअल व्हर्जन देखील उपलब्ध आहे, जे ॲपद्वारे चालवता येतं. WYLD कार्डच्या मदतीने तुम्ही खरेदी आणि खाद्यपदार्थांच्या ऑर्डरवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता. त्याच्या प्रेझेंटेशनदरम्यान, वाइल्डने 1000 रुपयांच्या खरेदीवर त्याला 600 रुपयांचा कॅशबॅक कसा मिळतो हे दाखवलं आहे. 

Instagram वरुन कसे कमवायचे पैसे?

सीईओ आणि सीओओसह तीन लोक WYLD च्या सादरीकरणासाठी आले होते. या पिचिंग दरम्यान त्यांनी सांगितलं की, इंस्टाग्राम पोस्टच्या मदतीने देखील तुम्हाला भरपूर कॅशबॅक मिळू शकतो. यासाठी इंस्टाग्रामवर किमान 1000 फॉलोअर्स असावेत. ही डील शोमधील प्रत्येक गुंतवणूकदाराला आवडली आणि  शेवटी WYLD ने Shaadi.com चे CEO अनुपम मित्तल यांच्यासोबत डील फायनल केली. 75 लाखांवर त्यांनी 1.50% इक्विटीची ऑफर दिली.

WYLD हे ॲप आधारित प्लॅटफॉर्म आहे. WYLD हा ॲप IOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या ॲपमध्ये वापरकर्त्यांना जास्तीत जास्त 80 टक्के कॅशबॅक मिळेल. यासाठी WYLD डेव्हलपरने ॲल्गोरिदम तयार केला आहे. क्रेडिट स्कोअर प्रमाणे, यात वाइल्ड स्कोर (WYLD Score) आहे, जो पोस्टच्या प्रसिद्धीनुसार किंवा पोस्ट रिचनुसार कॅशबॅक ठरवतो. 

सह-संस्थापकांनी सांगितलं की, ज्यांचा स्कोर 900 ते 1000 आहे, त्यांना WYLD इन्स्टाग्राम पोस्टवर 100% कॅशबॅक आणि स्टोरीवर 80% कॅशबॅक देईल. शार्क टँक इंडियामध्ये (Shark Tank India) ही माहिती देण्यात आली आहे. 

WYLD कसे काम करते?

WYLD वर कमाई करण्यासाठी काही अटी देखील आहेत. WYLD या ॲपवर लॉग इन केल्यानंतर वापरकर्ते बँकेतून वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकतात. यानंतर, WYLD पार्टनर स्टोअरमधून शॉपिंग आणि फूड ऑर्डरचे फोटो क्लिक करा आणि ते इंस्टाग्रामवर पोस्ट करा. या दरम्यान तुम्हाला WYLD ॲपद्वारे पेमेंट करावं लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला लवकरच कॅशबॅक मिळून जाईल. या कॅशबॅकने मिळालेल्या पॉईंट्सने तुम्हाला कुठेही शॉपिंग आणि फूड ऑर्डर करता येते. 

WYLD च्या अटी काय?

WYLD साठी काही अटी देखील आहेत, यामध्ये युजर्स एका महिन्यात एका ब्रँडच्या 2 पोस्ट करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही Lenskart च्या एका महिन्यात दोनपेक्षा जास्त पोस्ट करू शकत नाही.

हेही वाचा:

World News : अमेरिकेसह 'या' देशांत मुलांची 'ही' नावं ठेवणं गुन्हा; सरकारचे कठोर नियम, तुरुंगवासाचीही होऊ शकते कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकालBeed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतलाMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Astrology : महिन्याच्या पहिल्याच दिवशीच अनेक शुभ योगांचा महासंगम; मेषसह 5 राशींना मिळणार अफाट लाभ, महादेवाच्या कृपेने होणार धनवर्षाव
महिन्याच्या पहिल्याच दिवशीच अनेक शुभ योगांचा महासंगम; मेषसह 5 राशींना मिळणार अफाट लाभ, महादेवाच्या कृपेने होणार धनवर्षाव
Embed widget