TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP Majha नाशिक शिक्षक मतदार संघाचा निकाल आज जाहीर होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक महायुतीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी मतदारसंघात बैठका घेऊन मोर्चे बांधणी केली होती. महायुतीने दोन उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयाचा मार्ग सोपा असेल या अशी परिस्थिती असताना महायुतीने किशोर दराडे हेच एकमेव महायुतीचे उमेदवार असल्याची घोषणा केली. विरोधकांकडून निवडणुकीत किशोर दराडे यांच्यावर पैसे वाटण्याच्या आरोप देखील करण्यात आले होते. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती. निकालाच्या दिवशी महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी घरात देवदर्शन केले आणि कुटुंबियांकडून किशोर दराडे यांचे औक्षण करण्यात आले. किशोर दराडे यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.