World News : अमेरिकेसह 'या' देशांत मुलांची 'ही' नावं ठेवणं गुन्हा; सरकारचे कठोर नियम, तुरुंगवासाचीही होऊ शकते कारवाई
Child Names : घरात बाळाचा जन्म होताच घरात त्याचं नाव काय ठेवायचं? याची चर्चा सुरू होते. भारतात आपण आपल्या मनाप्रमाणे मुलांची नावं ठेवतो, पण जगात असे अनेक देश आहेत जिथे काही नावांवर बंदी आहे. तरीही तुम्ही मुलांची ही नावं ठेवली तर तुम्हाला तुरुंगवास देखील होऊ शकतो.
![World News : अमेरिकेसह 'या' देशांत मुलांची 'ही' नावं ठेवणं गुन्हा; सरकारचे कठोर नियम, तुरुंगवासाचीही होऊ शकते कारवाई World News you cannot give these names to your children in these countries government can take action World News : अमेरिकेसह 'या' देशांत मुलांची 'ही' नावं ठेवणं गुन्हा; सरकारचे कठोर नियम, तुरुंगवासाचीही होऊ शकते कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/06/d4473596ebf03f59e8f0f89fb7eddc7b1707184949392713_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Child Names : घरात जेव्हा लहान पाहुण्याचं आगमन होतं, त्यावेळी संपूर्ण कुटुंब बाळाच्या नावाबद्दल खूप उत्सुक असतं. कुटुंबातील सदस्यांसह सर्व नातेवाईक, मित्र परिवार बाळाचं नाव शोधण्यात गुंतलेले असतात. एवढंच नाही, तर मुलाच्या वेगवेगळ्या नावांबाबत कुटुंबीयांपासून नातेवाईकांपर्यंत सर्वांच्याच मनात संभ्रम असतो.
भारतात (India) जरी आपण आपल्या मनाप्रमाणे मुलांची नावं ठेवत असलो तरी जगात असे अनेक देश (Foreign Countries) आहेत, जिथे मुलांच्या नावाबाबत सरकारी नियम आहेत. जगात असे काही देश आहेत, जिथे काही नावांवर (Names) बंदी आहे. आज अशाच काही देशांबद्दल जाणून घेऊया, जिथे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या मुलांची ही काही नावं ठेवल्यास त्यांना तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.
ब्रिटन (Britain)
डेली स्टारच्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये आडनाव ठेवण्यावर बंदी नसली तरी नावाची नोंदणी करताना काही अटी दिलेल्या असतात, त्यानुसार काही नावं स्वीकारली जात नाहीत. ब्रिटनच्या नियमांप्रमाणे, बाळाच्या नावात अक्षरं असावीत, अंक नसावेत आणि नाव आक्षेपार्ह नसावे. नाव नोंदणी पानावर दिलेल्या जागेत बसेल इतकेच मोठे असावे. नाव खूप मोठं असेल तर नोंदणी करता येणार नाही.
हे नाव अमेरिकेत ठेवता येत नाही
अमेरिकन जन्म प्रमाणपत्रानुसार, आपण काही नावं ठेवू शकत नाही. ज्यामध्ये क्वीन, किंग, जीसस क्राइस्ट, येशु मसीह, III, सांता क्लॉज़, मजेस्टी,ॲडॉल्फ हिटलर, मसीहा, @ आणि 1069 या नावांचा समावेश आहे. काही देशांमध्ये नावांसाठी यापेक्षाही कठोर नियम आहेत. अमेरिकेत मुलांना देवाची नावं देण्यावर बंदी आहे, भारतात मात्र लोक आवर्जुन आपल्या मुलांची नावं देवीदेवतांच्या नावावरुन ठेवतात.
जगातील कोणत्या देशात कोणत्या नावांवर बंदी?
- सेक्स फ्रूट- Sex Fruit (न्यूजीलैंड)
- लिंडा-Linda (सऊदी अरब)
- स्नेक-Snake (मलेशिया)
- शुक्रवार-Friday (इटली)
- इस्लाम-Islam (चीन)
- साराह-Sarah (मोरोक्को)
- चीफ मॅक्सिमस-Chief Maximus (न्यूझीलंड)
- रोबोकॉप-Robocop (मेक्सिको)
- डेविल-Devil (जापान)
- ब्लू- Blue (इटली)
- कुराण-Quran(चीन)
- हॅरिएट-Harriet (आईसलँड)
- मंकी-Monkey (डेन्मार्क)
- थॉर-Thor (पोर्तुगाल)
- 007 (मलेशिया)
- ग्रीझमन एमबाप्पे (फ्रान्स)
- तालुला हवाई-Talula Hawaii (न्यूझीलंड)
- ब्रिज-Bridge (नॉर्वे)
- ओसामा बिन लादेन (जर्मनी)
- मेटालिका-Metallica (स्वीडन)
- प्रिन्स विल्यम (फ्रान्स)
- एनल-Anal (न्यूझीलंड)
- न्युटेला-Nutella (फ्रान्स)
- वुल्फ-Wolf (स्पेन)
- टॉम-Tom (पोर्तुगाल)
- कॅमिला-Camilla (आईसलँड)
- जुडास-Judas (स्वित्झर्लंड)
- ड्यूक -Duke (ऑस्ट्रेलिया)
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)