Astrology : महिन्याच्या पहिल्याच दिवशीच अनेक शुभ योगांचा महासंगम; मेषसह 5 राशींना मिळणार अफाट लाभ, महादेवाच्या कृपेने होणार धनवर्षाव
Panchang 01 July 2024 : आज सोमवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. मेषसह 5 राशींवर आज महादेवाची विशेष कृपा राहील. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology 01 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज, सोमवार, 1 जुलै रोजी चंद्र मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि गुरू हा चंद्रापासून पुढच्या घरात स्थित आहे, त्यामुळे सुनफा योग तयार होत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील दहावी तिथी असून या दिवशी सुकर्म योग, धृतिमान योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. मेष राशीचे लोक आज त्यांच्या कामात समाधानी दिसतील आणि त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे आणि महादेवाच्या कृपेने अडकलेले पैसेही परत मिळतील. आज व्यावसायिक आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकतील आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आपली प्रतिमा देखील सुधारेल. त्याच वेळी नोकरदार लोकांना आज नवीन नोकऱ्यांच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील आणि काही लोकांना सरकारी नोकरी मिळवण्यात यश मिळेल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं अधिक होईल. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील आणि मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
कर्क रास (Cancer)
आजचा दिवस कर्क राशीसाठी चांगला असणार आहे. कर्क राशीचे लोक आज आपली आर्थिक स्थिती मजबूत करतील आणि धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी होतील. नोकरी-व्यवसायात काही लोकांच्या कडूपणाचं रूपांतर गोड्यात करण्याची कला तुम्हाला आत्मसात करावी लागेल, त्यामुळे तुमचं काम पूर्ण होताना दिसेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना चांगले फायदे मिळतील आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळेल. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या जोडीदारासोहत बाहेर फिरायला जायचा प्लॅन कराल, ज्यामुळे नातं आणखी मजबूत होईल. भाऊ-बहिणींमध्ये काही वाद सुरू असतील तर ते आज मिटतील.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. नशिबाने साथ दिल्यास सिंह राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधीही मिळेल. आज नफा मिळवण्यासाठी व्यापारी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलतील आणि आपला ठसा उमटवू शकतील. जर आपण नोकरदार लोकांबद्दल बोललो तर, आज त्यांना इतर एखाद्या कंपनीकडून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळू शकते, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. अधिकाधिक पैसा कमावण्याचा विचार तुमच्या मनात असेल आणि तुम्ही या दिशेने कामही कराल. आई-वडिलांचे आशीर्वाद मिळतील आणि भावंडांशी संबंध चांगले राहतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार कराल.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. तूळ राशीच्या लोकांना महादेवाच्या कृपेने आज चांगला आर्थिक लाभ होईल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्हाला कमाईच्या उत्कृष्ट संधी मिळतील आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची योजनाही तुम्ही तयार कराल. आज तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. जर तुमच्या मुलाने कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्याला त्यात यश मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि सर्व प्रकारचे गैरसमजही दूर होतील.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. याशिवाय, तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर शिक्षक आणि हितचिंतकांचं सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. नोकरीच्या बाबतीत तुम्ही उल्लेखनीय प्रगती कराल आणि नवीन नोकरीसाठी तुमचा शोध देखील पूर्ण होईल. त्याच वेळी, चांगला नफा मिळवण्याचे व्यावसायिकांचे उद्दिष्ट पूर्ण होईल आणि ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना कठोर स्पर्धा देतील. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं तर, सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील आणि मन देखील आनंदी असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: