Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
Monday Remedies : सोमवारी मनापासून भगवान शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, अशी श्रद्धा आहे. दर सोमवारी महादेवाची भक्तिभावे पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख-शांती देखील लाभते.
Happy Married Life : सोमवारी भगवान शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण सोमवारी उपवास ठेवतात आणि मनापासून भगवान शंकराची पूजा करतात. असं म्हणतात की, भोलेनाथ अतिशय भोळे असून ते भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. सोमवारी भगवान शंकराची पूजा आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय हे अतिशय प्रभावी मानले जातात. असं मानलं जातं की, हे उपाय (Monday Remedies) केल्याने वैवाहिक जीवनात सुख-शांती लाभते आणि भक्तांवर शिवाची कृपा होते. त्यामुळे भक्तगण भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात, या दिवशी काही उपाय केल्याने उत्तम फळ प्राप्त होतं. सोमवारी करावयाच्या याच उपायांबद्दल जाणून घेऊया.
सोमवारी करा 'हे' उपाय (Monday Remedies)
1) सोमवारी मनापासून भक्तिभावे भगवान शिवाची आराधना केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी सकाळी उठून स्नान करून शंकराची पूजा करावी.
2) सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी शिवलिंगावर चंदन, अक्षत, बेलाची पानं, धतुरा, दूध आणि गंगाजल अर्पण केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात, असं मानलं जातं.
3) सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर, गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. सोमवारी शिव शंकराची उदबत्ती आणि दीप लावून आरती करावी आणि प्रसाद वाटावा. असं केल्याने शिवाच्या कृपेने सर्व संकटं दूर होतात आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती नांदते.
4) सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप केल्याने भोलेनाथाची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी कच्च्या गाईचं दूध शिवलिंगावर अर्पण करणं देखील एक प्रभावी उपाय मानला जातो
5) सोमवारी आंघोळ केल्यावर पांढरे वस्त्र परिधान करावे. या दिवशी पांढर्या रंगाचे खाद्यपदार्थ गरजूंना दान करावेत, यामुळे कुंडलीतील चंद्र ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि घरात सुख-शांती नांदते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: