एक्स्प्लोर
Advertisement
SBI चे बेसिक फोनवर वापरता येणारे मोबाईल वॉलेट लवकरच
भुवनेश्वर: स्टेट बँक ऑफ इंडियाचे बेसिक किंवा फिचर मोबाईल फोनवर सहज वापरता येईल, असे मोबाईल वॉलेट 15 डिसेंबरपर्यंत लॉन्च होणार असल्याची माहिती बँकेच्या संचालिका अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली. ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये आयोजित एका कार्यक्रमावेळी त्यांनी ही माहिती दिली.
भट्टाचार्य म्हणाल्या की, '' स्मार्टफोन यूजर्ससाठी बँकेचे State Bank Buddy हे अॅप यापूर्वीच मोबाईल यूजर्सच्या सेवेत असून, ग्रामीण भागातील ग्राहकांना कॅशलेस व्यवहाराकडे वळवण्यासाठी बेसिक मोबाईल फोनवर वापरता येणारे मोबाईल वॉलेट डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत लॉन्च होणार आहे.''
त्या पुढे म्हणाल्या की, ''यासाठी बीएसएनएलसोबत या बेसिक मोबाईल वॉलेटचे काम सुरु आहे. हे काम 15 डिसेंबरपर्यंत हे पूर्ण होण्याची शक्यता आहे.''
दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातून स्वाईप मशिनची मागणी देशभरातून वाढली आहे. सध्या देशभरात एसबीआयचे 40 हजार स्वाईप मशिन विविध ठिकाणी कार्यरत असून, अजून दीड लाख मशिनची गरज आहे. त्यामुळे ही गरजही लवकरच पूर्ण करण्यात येईल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर उद्भवलेल्या अभूतपूर्व चलन टंचाईत डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली. या पहिल्या अनुभवाबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, ''चलन टंचाईच्या पार्श्वभूमीवरदेखील आमच्या देशभरातील 48 हजार एटीएम सेंटरपैकी 40 हजार एटीएम सेंटर कार्यरत होती. मात्र या सर्व एटीएम सेंटरवरुन फक्त 2500 रुपये प्रत्येक व्यक्तींना काढण्याची मुभा असल्याने थोडीफार नागरिकांची अडचण झाली असावी.''
त्या पुढे म्हणाल्या, नव्या नोटांमुळे एटीएमच्या नुतनीकरणाचे काम सुरु असून, येत्या दोन ते तीन दिवसांत ते पूर्ण होईल. ओडिशामधील हे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
नोटाबंदीमुळे ग्रामीण भागावर होणाऱ्या परिणामांबाबत त्या म्हणाल्या की, ''नोटाबंदीमुळे निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी आमचे देशभरात 56 हजार वाणिज्य प्रतिनिधी आम्हाला मदत करत आहेत. यातील 33 हजार कार्यरत काम करत आहेत.'' ओडिशामध्ये ही संख्या 3376 असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement