एक्स्प्लोर

Health Department : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीवर पुण्यात गुन्हा नोंद, सायबर क्राईमकडून तपास सुरु

Health Department : आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड वर्गाच्या परीक्षेमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. आता आरोग्य विभागाकडून याबाबत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पुणे : आरोग्य विभागाच्या 'गट ड' या वर्गासाठी 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेला पेपर फुटल्याबद्दल पुणे सायबर क्राईमने गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आल्याची माहिती सायबर क्राईम विभागाने दिली. आरोग्य विभागाच्या 'गट ड' परीक्षेचा पेपर परीक्षेआधी पेपर फोडून 100 पैकी 92 प्रश्नांची उत्तरे लिखित स्वरूपात पसरवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा
आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत ढिसाळ नियोजन आणि चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या मुद्यावरून काही दिवसांपूर्वीच गदारोळ झाला होता. ही परीक्षा घेणाऱ्या 'न्यासा'  कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता, चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळालेल्या आरोग्य विभागाच्या उमेदवारांच्या परीक्षा न्यासा कंपनीच घेणार आहे. 28 नोव्हेंबरला 589 विद्यार्थ्यांची 11 संवर्गाची परीक्षा नाशिक, पुणे, लातूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये घेतली जाणार आहे.

गट क परीक्षेमध्येही गोंधळ
गेल्या महिन्यात, 24 ऑक्टोबरला गट 'क' साठी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या पदाच्या (संवर्गाच्या) प्रश्नपत्रिका मिळाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. तर या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीचे प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्याचेही निर्दशनास आले होते. घडलेल्या या प्रकारानंतर 'न्यासा कम्युनिकेशन' यांनी उमेदवारांनी दिलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्‍नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्‍नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचे  आवाहन केले होते. त्यानुसार आता हे यादी प्राप्त झाली असून अशा उमेदवारांची परीक्षा परत घेण्यात येणार आहे.  ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती त्याच उमेदवारांची पुन्हा परीक्षा होणार आहे. एकूण 589 उमेदवारांची होणार गट 'क' ची परीक्षा पुन्हा होणार आहे.

अशी होणार परीक्षा 
या विद्यार्थ्यांची शंभर गुणांची परीक्षा न घेता 40 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 50 मिनिटांचा वेळ असणार आहे. इतर 60 प्रश्न हे सर्व संवर्गासाठी सारखे असल्याने फक्त 40 गुणांची परीक्षा होणार आहे.

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

Embed widget