एक्स्प्लोर
जगातील एकमेव संस्कृत वृत्तपत्र बंद होणार?
मुंबई: जगातील एकमेव संस्कृत वृत्तपत्र 'सुधर्मा' एका महिन्यानंतर 46 वर्ष पूर्ण करु शकेल. राजकारण, योग वेद आणि संस्कृति समवेत इतर बातम्या देणाऱ्या या वृत्तपत्राचा खप 4,000 आहे. मात्र हे वृत्तपत्र आता लवकरच दिसेनासं होण्याची शक्यत आहे.
संस्कृत विद्वान कलाले नांदूर वरदराज अंय्यगारनं संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी 15 जुलै 1970 रोजी हे वृत्तपत्र सुरु केलं होतं. पण आता हे वृत्तपत्र चालवणं हे फारच संघर्षपूर्ण असल्याचं आयंगर यांचे पुत्र आणि सुधर्माचे संपादक के वी. संपत कुमार यांनी म्हटलं आहे.
संपत कुमार यांच्यामते, 'या वृत्तपत्राचा खप दिवसेंदिवस कमी होत आहे. कारण की सरकारकडून यासाठी कोणतंही यासाठी कोणतंही सहकार्य मिळत नाही. हे दु:खद आहे की, ज्या भाषेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्या संस्कृतच्या ऐतिहासिक भूमिकेला आपण समजू शकत नाही.'
या वृत्तपत्राचा खप 4000 जरी असला तरीही याच्या ई-पेपरचे वाचक हे लाखाहून अधिक आहेत. दरम्यान, देशामध्ये 13 संस्कृतव विद्यापीठं आणि कर्नाटकमध्ये 18 संस्कृत कॉलेज आहे. मात्र, तरीही जगातील एकमेव संस्कृत वृत्तपत्र वाचविण्यास अद्याप तरी कुणीही पुढं आलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement