एक्स्प्लोर

Sanjay Raut | दिल्ली हिंसाचार हा शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीचा पूर्वनियोजित कट -संजय राऊत

शेतकरी आंदोलनाला मिळणारी देशाची सहानुभूती कमी करायची असेल तर आंदोलन बदनाम करणे आवश्यक होतं असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. राष्ट्रवादाच्या आधारे आता शेतकऱ्यांनी उखडून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असाही आरोप त्यांनी केला.

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत झालेला हिंसाचार हा शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीचा केंद्र सरकारने आखलेला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शेतकऱ्यांना मिळणारी सहानुभूती जर कमी करायची असेल तर सरकारला आंदोलन बदनाम करण्याची गरज होती असेही ते म्हणाले.

खासदार संजय राऊत म्हणाले की, "सिंघू बॉर्डरवर पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय, त्यांच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधूराचा वापर करण्यात येतोय. आता केंद्र सरकारला बळाचा वापर करुन शेतकऱ्यांना उखडून टाकायचं आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. हे काम नक्कीच सरकारचं आहे, कारण भारतीय जनता पक्षाशी संबंधित एका गटाने हा हिंसाचार घडवल्याचं समोर आलंय."

त्या ठिकाणी लाखो शेतकरी असताना, शेतकऱ्यांचा एक गट त्या ठिकाणाहून बाहेर पडतो आणि त्याचं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित व्यक्ती करतो. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला असे सांगत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटक सरकारने विसरु नये : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले की, "आतापर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन हे शांततेत सुरु होतं. देशातील नागरिकांची सहानुभूती त्याला होती. शेतकऱ्यांना मिळणारी ही सहानुभूती जर कमी करायची असेल तर हे आंदोलन बदनाम करायची गरज होती. त्याला बदनाम करण्यासाठी मग कट रचण्यात आला. त्या ठिकाणी राष्ट्रवाद आणण्यात आला. तिरंग्याचा अपमान झाल्याचं सांगण्यात आलं. हे नेहमीचे हातखंडे वापरण्यात आले."

संजय राऊत पुढे म्हणाले की, "तिरंग्यापर्यंत कोणीही पोहचलं नाही. दुसऱ्या एका घुमटावर शीख समाजाचा धार्मिक ध्वज फडकवण्यात आला. हे सगळं करणारे भारतीय जनता पक्षाचे लोकं होते हे आता समोर आलंय. मग संसदेचे आधिवेशन सुरु होत असताना त्या शुभमुहूर्तावर सरकारला लोकशाहीचा गळा घोटायचा आहे."

Sanjay Raut on Delhi Violence: सरकारने ठरवलं असतं तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती : संजय राऊत

पंतप्रधान मोदी सर्व गोष्टीवर बोलतात पण शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बोलत नाहीत असे सांगत ते म्हणाले की, "सरकारला वाटतं कायदा चांगला आहे पण तो लोकांनीच स्वीकारला नाही तर काय उपयोग. या कायद्याला स्थगिती द्या आणि यावर संसदेत चर्चा करा, यात कसला अहंकार बाळगताय?"

अण्णा हजारेंनी भूमिका घ्यावी अण्णा हजारेच्या संबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "शिवसेना पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. अण्णा हजारेंनी या प्रश्नी भाजप नेत्यांच्या प्रस्तावावर चर्चा न करता शेतकऱ्यांना पाठिंबा द्यावा आणि आंदोलन करावं. त्यांनी भाजप नेत्यांशी चर्चा न करत बसता ठाम भूमिका घ्यावी आणि देशाला साद घालावी. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जी भूमिका घेतली आहे त्यावर अण्णा हजारेंनी आपलं मत मांडावं."

प्रजासत्ताकस दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर आता सिंघु बॉर्डरवर पोलिसांकडून लाठीमार केला जात आहे असं सांगण्यात येतंय. आंदोलक शेतकऱ्यांनी ही जागा रिकामी करावी यासाठी सिंघु बॉर्डच्या आजूबाजूच्या नागरिकांनी हंगामा केल्याचंही समजतंय.

लष्कराची गुपितं बाहेर कशी येतात? अर्णब गोस्वामी यांच्या व्हायरल चॅटसंदर्भात खासदार संजय राऊत यांचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Embed widget