Sanjay Raut on Delhi Violence: सरकारने ठरवलं असतं तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती : संजय राऊत
सरकार शेतकरीविरोधी कायदा रद्द का करत नाही? कोणतीही अदृश्य शक्ती राजकारण करत आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला
![Sanjay Raut on Delhi Violence: सरकारने ठरवलं असतं तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती : संजय राऊत government taken decision, then the violence could have been stopped, says Sanjay Raut Sanjay Raut on Delhi Violence: सरकारने ठरवलं असतं तर दिल्लीतील हिंसा रोखता आली असती : संजय राऊत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/14162949/Sanjay-Raut.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड वेळी अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. शेतकर्यांच्या गटाने थेट ऐतिहासिक लाल किल्ल्यावरही आपला ध्वज फडकवला. या घटनेचा चहुबाजूने निषेध केला जात आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार की जो बायडनचा? या घटनेनंतर राजीनामा तर बनतो, अशी टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, दिल्लीत जे झाले आहे त्याला कोणीही पाठिंबा देऊ शकत नाही. सरकारला हवे असते तर आजचा हिंसाचार रोखता आला असता. दिल्लीत जे चालले आहे त्याचे समर्थन कोणीच करू शकत नाही. लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान कोणीही सहन करणार नाही. पण वातावरण का बिघडले? सरकार शेतकरीविरोधी कायदा रद्द का करत नाही? कोणतीही अदृश्य शक्ती राजकारण करत आहे का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
Republic Day 2021 | दिल्लीत धुमश्चक्री; ट्रॅक्टर परेडमधील 10 मोठ्या घडामोडी
सरकार या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतं का? सरकारने शेवटपर्यंत लाखो शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं नाही. आपल्या देशात कोणत्या प्रकारच्या लोकशाही सुरु आहे? लोकशाही नाही, भलतच काहीतरी सुरु आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
दिल्लीत नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सिंघू सीमा आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पोलिसांना झुगारुन लावत दिल्लीत प्रवेश केला. ज्यानंतर बराच वेळ हे शेतकरी मुकरबा चौक इथं थांबलेले होते. पण, मग त्यांनी बॅरिगेट आणि सीमेंटचे अवरोधक तोडण्याचा प्रयत्न केला. मुकरबा चौकात पोलिसांनी बेभान शेतकऱ्यांना आळा घालण्यासाठी म्हणून पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.
प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडच्या माध्यमातून शेतकरी करणार सीमोल्लंघन
काही शेतकऱ्यांनी दिल्ली पोसील मुख्यालयाबाहेर जबाबदारी बजावणाऱ्या पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. काही वाहनांची तोडफोडही येथे करण्यात आली. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतरही शेतकरी आंदोलकांनी अतिशय आक्रमक स्वरुपात लाल किल्ला गाठला. इथं त्यांनी मोठमोठ्यानं घोषणा देण्यासही सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)