एक्स्प्लोर

Sambhaji Chhatrapati: गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही! आता तरी सरकारने जागे व्हावे आणि खाशाबा जाधवांना उचित सन्मान द्यावा: संभाजीराजे छत्रपती

खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या  97 व्या जयंतीनिमित्त गूगलनं खास डूडल तयार केलं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलं.

Sambhaji Chhatrapat: सर्च इंजिन गूगलनं (Google)  कुस्तीगीर खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांच्या  97 व्या जयंतीनिमित्त खास डूडल तयार केलं आहे. या डूडलच्या माध्यमातून गूगलनं खाशाबा जाधव यांना अभिवादन केलं आहे. आता खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डूडलद्वारे अभिवादन केले आहे. पण त्यांच्या कार्याला उचित सन्मान देऊन अभिवादन करण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे, अशी पोस्ट संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapat) यांनी केली आहे. 

संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून "पद्म" पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत.'

 संभाजीराजे छत्रपती राज्यसभा खासदार असताना त्यांनी 2017 ते 2022 अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर "पद्मविभूषण" मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला होता मात्र शेवटी त्यांची उपेक्षाच झाली, ही भावनाही त्यांनी आपल्या पोस्ट मधून मांडली आहे.  

संभाजीराजे छत्रपती  यांची पोस्ट

आता तरी सरकारने जागे व्हावे, असे म्हणत या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणाऱ्या खाशाबा जाधव यांना "पद्म" पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

ऑलिम्पिकच्या दुनियेत ज्यांनी देशाला पहिलं पदक मिळवून दिलं, त्या खाशाबा जाधवांना पद्मश्री पुरस्कार मिळत नसल्याची खंत रणजित जाधव यांनी व्यक्त केली होती. सरकारने दखल न घेतल्याने रणजित जाधव यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. 

खाशाबा जाधव यांच्या 97व्या जयंतीनिमित्त गूगलनं खास डूडल तयार केलं आहे. गूगलच्या या डूडलमध्ये कुस्तीचा आखाडा दिसत आहे. तसेच खाशाबा जाधव यांचे चित्र देखील या डूडलमध्ये दिसत आहे.  1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे भारताला स्वातंत्र्योत्तर काळात मिळालेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता.  

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:  

Khashaba Dadasaheb : कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची 97 वी जयंती; गूगलचं खास डूडल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget