एक्स्प्लोर
Advertisement
सनातन धर्माच्या प्रसारासाठी गरज पडल्यास हत्यार उचलायलाही मागे हटणार नाही : साध्वी प्रज्ञा ठाकूर
सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गरज पडल्यास शस्त्राचा वापर करायलाही मागे हटणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूरने केलं आहे.
प्रयागराज : सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गरज पडल्यास शस्त्राचा वापर करायलाही मागं हटणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा ठाकूरनं केलं आहे.
प्रज्ञा ठाकुरनं प्रयागराज येथे नव्या आखाड्याची स्थापना केली आहे. 'भारत की भक्ति' असं या आखाड्याचं नाव आहे. या आखाड्याद्वारे लोकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणे तसेच अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाबाबत जागरुकता केली जाणार आहे. "हा आखाडा शास्त्रानूसार सनातन धर्माचा प्रचार-प्रसार करेल, तसेच गरज पडल्यास शस्त्राचा वापर करण्यातही मागे राहणार नाही", असं वक्तव्य यावेळी प्रज्ञा ठाकूरनं केलं आहे.
"सनातन धर्मावरील वाढत्या हल्ल्यांमुळे नवीन आखाडा सुरु करण्याचे आपण ठरवले. हा आखाडा या अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढेल तसेच कायदेशीर मदतही उपलब्ध करुन देईल. तसेच गरज पडल्यास शस्त्राचा वापर करण्यातही मागे राहणार नाही", असं वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा ठाकूर हिने केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement