एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चेन्नईतील धाडीत 170 कोटी जप्त, त्यात नव्या नोटा 70 कोटींच्या!
चेन्नई : चेन्नईतील काही ज्वेलर्सच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत मोठं घबाड सापडलं आहे. त्यात तब्बल 170 कोटी रुपयांची रोकड आणि 130 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. चेन्नईत 8 ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केल्याची माहिती आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे जप्त करण्यात आलेल्या रोकडीपैकी 70 कोटींची रक्कम नव्या नोटांच्या स्वरुपात आहे. 20 कोटी रुपये हे चलनातून बाद झालेल्या पाचशे, हजारच्या नोटांच्या रुपात आहे. पैशांची मोजणी अजूनही सुरु आहे.
नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आयकर विभागाने 400 पेक्षा जास्त बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणांचा तपास केला आहे. 6 डिसेंबरपर्यंत 130 कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.
बंगळुरुमध्ये चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा सापडण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. तर दोन हजार कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता करदात्यांनी जाहीर केली आहे.
संबंधित बातम्या :
नोटाबंदीनंतर दोन हजार कोटींची अघोषित मालमत्ता जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement