एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मायावतींच्या भावाची संपत्ती 7 कोटीवरुन 1316 कोटींवर
लखनऊ: नोटाबंदीनंतर कुणाकडे किती संपत्ती याबाबतच्या चर्चांना उधाण आलं. मात्र तिकडे उत्तर प्रदेशात निवडणुकीमुळे तर ही चर्चा जास्त रंगली.
बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या भावाच्या संपत्तीचे डोळे दिपवणारे आकडे समोर आले आहेत.
मायावतींचा भाऊ आनंद कुमार यांची संपत्ती अवघ्या 7 वर्षात 7.5 कोटीवरुन 1316 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 2007 ते 2014 या दरम्यान मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या. त्याच काळात आनंद कुमार यांच्या संपत्तीने मोठी झेप घेतली आहे.
सर्वसामान्य व्यक्ती, व्यावसायिक किंवा बिल्डर यांच्या संपत्तीचा आलेख दहा वर्षात किती वाढू शकतो, याचा आपण एक ठराविक अंदाज बांधू शकतो. मात्र आनंद कुमार यांच्या संपत्तीने सर्वांचे अंदाज खोडून काढले आहेत.
केवळ 7.5 कोटी वरुन थेट 1316 कोटी संपत्तीमुळे अनेकांचे डोळे चक्रावले आहेत.
'टाईम्स नाऊ' या वृत्तवाहिनीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 'टाईम्स नाऊ'च्या हाती काही दस्तऐवज लागले आहेत. त्यानुसार आनंद कुमार यांनी बनावट कंपन्यांची नोंद करुन, कर्ज मिळवलं आणि त्याची रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement