एक्स्प्लोर
एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली: पाचशे आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटांनंतर आता हजार रुपयांची नवी नोटही चलनात येणार आहे. अर्थ मंत्रालयाचे सचिव शक्तीकांता दास यांनी ही माहिती दिली आहे.
राजधानी दिल्लीत अरुण जेटलींच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शक्तीकांता दास यांनी ही माहिती दिली आहे. येत्या काही महिन्यात नव्या सुरक्षा मानकांसह एक हजार रुपयांची नोट चलनात येणार आहे. या नोटेचे रुपरंग आणि आकार पहिल्या नोटेहून पूर्णतः वेगळं असणार आहे.
तसेच येत्या काळात सर्वच नोटा या नव्या स्वरुपात येणार असल्याची माहितीही अर्थ सचिवांनी दिली आहे. त्यामुळे सर्वच नोटा या आता वेगळ्या रंगात आणि डिझाईनसह येत्या काही काळात पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने काल बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज नोटा बदलण्यासाठी तसंच पैसे जमा करण्यासाठी बँके आणि पोस्ट ऑफिसमध्ये चांगलीच झुंबड उडणार आहे.
आजपासून ते 30 डिसेंबरपर्यंत नागरिकांना त्यांच्याकडून पाचशे आणि हजारांच्या बदलून मिळणार आहेत. यासोबतच दोन हजारच्या नव्या नोटा आजपासून चलनात येणार आहेत.
संबंधित बातम्या
तुमच्या ATM वरुन किती पैसे काढू शकाल?
नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं स्वागत : पवार
500, 1000 च्या नोटांसंबंधीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर
नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सोन्याचा दर वधारला
एकच फाईट, वातावरण टाईट, सोशल मीडियावर विनोदांची त्सुनामी
टोलनाका, एटीएम, पेट्रोल पंपावर गर्दी, सामान्यांना मनस्ताप
आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटांची झलक
देशभरातील सर्व एटीएम आज बंद, बँकांचे व्यवहारही ठप्प
कधीपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा करता येणार?
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा कुठे जमा करता येणार?
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement