एक्स्प्लोर
एक हजाराची नवी नोट सोशल मीडियात व्हायरल!
मुंबई: पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या नोटाबंदींच्या निर्णयानंतर बाजारात 500 आणि 2000च्या नव्या नोटा आल्या. पण सध्या एक हजार रुपयांची नवी नोट सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. ही नवी नोट खरंच छापण्यात आली आहे की, ही मॉर्फ केलेली नोट आहे का? याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समजू शकलेली आहे.
दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयानंतर १०००ची नवी नोट चलनात येणार असल्याचे केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी जाहीर केलं होतं. पण त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटलींनी त्यांचा हा दावा नाकारला होता. तूर्तास तरी 1000ची नवी नोट बाजारात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, आता ही नवी नोट सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असल्यानं 1000ची नोट बाजारात येणार का? याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्याआधी 2000 रुपयांची नवी नोट अशीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता एक हजाराची नोटही सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यामुळे ही नोट बाजारात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, 2000च्या नोटेचा फोटो सोशल मीडियात व्हायरल व्हायला लागल्यानं पंतप्रधान मोदींनी 18 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणारा नोटाबंदीचा निर्णय 8 नोव्हेंबरलाच जाहीर केला. पण, पुरेशी तयारी नसताना हा निर्णय घ्यावा लागल्यानं यामुळे देशभरात चलनाचा तुटवडा पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर नव्या 2000च्या नोटेवर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. 1000च्या नोटा बंद करुन 2000च्या नोट का छापण्यात आली? असा सवाल केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement