एक्स्प्लोर

Israel Vs Iran War: इस्रायल-अमेरिका पेटून उठले, इराणवर धडाधड मिसाईल हल्ले; पण युद्धामागचं नेमकं कारण काय?, A टू Z माहिती

Israel Vs Iran War: अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायलदेखील इराणवर जोरदार हल्ले करत आहे. इस्रायलच्या संरक्षण दलांनी इराणच्या 30 ठिकाणांवर हल्ला केला.

Israel Vs Iran War: मध्य पूर्वेतील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणनेही प्रत्युत्तर दिलं आहे. या हल्ल्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून इस्रायलदेखील इराणवर जोरदार हल्ले करत आहे. इस्रायलच्या संरक्षण दलांनी इराणच्या 30 ठिकाणांवर हल्ला केला. त्यात अनेक सैन्य ठिकाणांचा समावेश आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 200 इराणी नागरिकांच्या मृत्यू झाला असून 800 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पण इराणवर अमेरिका आणि इस्रायल पेटून का उठले?, युद्धामागचं नेमकं कारण काय?, याबाबत नक्की जाणून घ्या...

इराणवरील हल्ल्याचे कारण काय? (what reason for the war between Iran and Israel)

2025 मध्ये इराण-इस्त्रायल युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षांमुळे इस्त्रायच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की, ते त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा अनियंत्रित विस्तार करू देणार नाहीत. परंतु, इराणने अशा कोणत्याही गोष्टींना जुमानले नाही. इराणने आपला संवेदनशील अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संबंधित प्रक्रिया सुरूच ठेवल्या. अनेकदा इशारे देऊनही इराण थांबत नाही, असे दिसताच इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

युद्ध अधिक भडकल्यास, पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता- (Israel Vs Iran War)

इराण हा जगातील प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक भडकल्यास, पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊन, त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते. जर हा संघर्ष अधिक चिघळला, तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो. जर किमतीत मोठी वाढ झाली तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते. तसेच, येणाऱ्या काही आठवड्यांत बाजारात मोठी अस्थिरता आणि चढ-उतार पाहायला मिळतील, असाही अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सोने आणि चांदी महाग होतील. युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण होते. गुंतवणूकदार पैसे शेअर बाजारातून काढून सोने आणि चांदीमध्ये गुंतवतात. यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती ऐतिहासिक पातळीवर जाऊ शकतात. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा याच आठवड्यात इस्रायलचा दौरा- (Narendra Modi Israel Tour)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आठवड्यात इस्रायलचा दौरा केला होता. या दौऱ्यात अनेक संरक्षण, आर्थिक करार झाले. इस्रायलसोबतचे संबंध भारतासाठी महत्त्वाचे आहेत. दुसरीकडे इराणच्या चाबहार बंदरात भारताची मोठी गुंतवणूक आहे. या बंदराचं आर्थिक आणि सामरिक महत्त्व मोठं आहे. इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका युद्धात एका देशाची बाजू घेणं भारतासाठी आव्हानात्मक आहे.

ही बातमीही वाचा:

Israel Vs Iran War: अमेरिका–इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा परिणाम, जागतिक पातळीवर 'या' 10 गोष्टी बदलणार, भारतावर काय परिणाम होणार?

Israel vs Iran War Jonny Bairstow: आम्हाला घरी पोहोचवा...इराण-इस्रायल-अमेरिकेच्या युद्धात IPL मधील दिग्गज खेळाडू यूएईमध्ये अडकला, पंतप्रधानांकडे मागितली मदत

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल

Embed widget