Farmer Protest | सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणे भारतरत्नचा अपमान, RJD च्या शिवानंद तिवारी यांची टीका
सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट केल्यावरुन शिवानंद तिवारी यांनी टीका केली. सचिन तेंडुलकरांसारख्या लोकांना अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले, हा भारतरत्नचा अपमान आहे.
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला दिलेल्या भारतरत्न पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट केल्यावरुन शिवानंद तिवारी यांनी टीका केली.
माध्यमांशी बोलताना शिवानंद तिवारी म्हणाले की, "त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, परंतु त्यांचं जाहिरातीत काम करणे सुरूच आहे. ते एक मॉडेल आहेत. सचिन तेंडुलकरांसारख्या लोकांना अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले, हा भारतरत्नचा अपमान आहे."
"आज लोकांनी ट्विटरच्या माध्यमातून राजकारण सुरू केलं आहे. मात्र खेड्यांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना मायक्रो-ब्लॉगिंग साइट्स किंवा सोशल मीडियाच्या अन्य प्रकारांबद्दल माहिती देखील नाही, असं शिवानंद तिवारी यांनी म्हटलं.
सचिन तेंडुलकरने काय म्हटलं होतं?
सचिन तेंडुलकर यांनी ट्विट केले की, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही." बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया."
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले होते. गायिका रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या सारख्या अनेक सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत ट्वीट केले होते. जागतिक सेलिब्रिटींनी हा विषय उपस्थित केल्यानंतर देशातून याला विरोध होत आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकरसह सुनील शेट्टी, अक्षय कुमार, अजय देवगण यांनी ट्वीट करत हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे असं म्हणत या सेलिब्रिटींनी विरोध केला होता.
संबंधित बातम्या