एक्स्प्लोर
Worli Fire: वरळीतील महाकाली नगरमध्ये भीषण आग, झोपडपट्टीला आग, सिलेंडरचा स्फोट
मुंबईतील वरळी (Worli) भागातील महाकाली नगरमध्ये (Mahakali Nagar) रविवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली.. या आगीत सुमारे 12 ते 15 झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर आगीदरम्यान सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्राथमिक वृत्तानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ही एक दिलासादायक बाब आहे. ही आग मीटर रूममधील शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस, बेस्टचे कर्मचारी आणि BMC वॉर्ड कर्मचारीही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















