Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनमध्ये काँग्रेस- राजद आणि काँग्रेस-सीपीआय आमने सामने आले आहेत. तर, राजद-व्हिआयपी आमने सामने आलेत.

पाटणा : बिहार विदानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, इंडिया अघाडीतील पेच सुटलेला नाही. महागठबंधनमधील राजकीय पक्ष काही जागांवर आमने सामने आले आहेत. महागठबंधनमधील काँग्रेस, राजद, व्हीआयप, सीपीआय आमने सामने आले आहेत. हा पेच एकूण 11 जागांवर असल्याची माहिती आहे.
Congress vs RJD : काँग्रेस-राजद आमने सामने
महागठबंधनमध्ये 6 जागांवर राजद- काँग्रेस आमने सामने आहेत. तर तीन जागांवर सीपीआय- काँग्रेस आमने सामने आले आहेत. तर, दोन जागांवर राद आणि व्हीआयपी आमने सामने आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस 19 ऑक्टोबर आहे. एकमेकांच्या जागांवर दावा केला गेल्यानं राजद आणि काँग्रेसमधील चर्चा बंद आहे. दुसरीकडे राजदकडून उमेदवार दिले जात आहेत.
बिहार काँग्रेस अध्यक्ष राजेश राम यांच्या विरोधात कुटुंबा जागेवरुन राजदनं सुरेश पासवान यांना तिकीट दिलं आहे. राजेश राम यांनी म्हटलं की तेजस्वी यादव आघाडीच्या कराराच्या विरुद्ध काम करत आहेत. दलितांचं प्रतिनिधित्व कमोजर करत आहेत. राजदनं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दिनारा, डिहरी, सासाराम, नवनीनगर, नोह, रफीगंज, टिकारी, नवादा,रजोली, रुन्नीसैदपूर, सुरसंड आणि बाजपट्टी या जागांवर उमेदवार दिले नाहीत.
डिहरी आणि सासाराम या जागेवर काँग्रेस आणि राजद दावा करतेय. कहलगाव, वैशाली, लालगंज, सिकंदरा, कुटुंबा आणि वारिसलीगंज या जागेवर काँग्रेस आणि राजद आमने सामने आहे. बेगुसरायमध्ये बछवाडा जागेवर काँग्रेस आणि सीपीआय आमने सामने आहेत. याशिवाय सीपीआयनं रोसडा, बिहारशरीफ आणि राजापाकडमध्ये उमेदवार दिले आहेत.
त्याचप्रमाणं तारापूर आणि चैरपूरमध्ये व्हीआयपी आणि राजद आमने सामने आहे. चैनपूरमधून राजदनं बृज किशोर बिंदू यांना उमेदवारी दिली आहे. तर व्हीआयपीनं बालगोविदं बिंद यांना उमेदवारी दिली आहे. महागठबंधनच्या नेत्यांकडून काही उत्तर दिलं जात नसल्यानं कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
























