Parbhani Accident : मुंबईतील निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
Parbhani Accident : परभणीतील पाथरी येथील पोखरणी रोडवर झालेल्या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

परभणी : मुंबईच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीने दुचाकीला उडवले. या घटनेत दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्यापैकी एक जण ठार झाला तर एक जण जखमी झालाय.परभणीच्या पाथरी येथील पोखरणी रोड वर ही घटना घडली.
मुंबईत निवासी उपजिल्हाधिकारी असलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीने पाठमागून दुचाकीला उडवल्याची घटना परभणीच्या पाथरीत घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. रम्यान प्रकरणात पोलिसांनी बराच वेळ गुप्तता पाळून चालका वर गुन्हा दाखल केला आहे.
मानवत तालुक्यातील वझूर येथील 55 वर्षीय प्रल्हाद माणिकराव चव्हाण आणि हनुमान वैराळे हे दोघे पाथरीहून दुचाकीवरून वझूर कडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या एमएच 14 जीडी 7704 या इनोव्हा कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.या अपघातात प्रल्हाद चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर हनुमान वैराळे हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील इनोव्हा कार ही मुंबईत निवासी उपजिल्हाधिकारी असलेल्या लंगडापुरे यांची असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. मात्र, त्यांचे नाव सांगण्यास नकार दिला आहे. अपघातग्रस्त वाहनावर महाराष्ट्र शासन’ असा उल्लेख देखील आहे. या घटनेनंतर घटनास्थळावर ग्रामस्थांनी गर्दी केली. दरम्यान, संबंधित महसूल अधिकाऱ्याला पोलीस संरक्षणात घटनास्थळावरून बाहेर नेण्यात आले त्यांच्यासोबत त्यांच्या मुली होत्.या आणि चालकावर रात्री उशिरा या प्रकरणात मृताचे भाऊ सखाराम चव्हाण यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यूला कारणीभूत असलेल्या कलमान्वये गाडीचा चालक योगेश बोरादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























