एक्स्प्लोर
Panvel Water Crisis: पाणीटंचाईमुळे पनवेलमध्ये नवीन बांधकामांवर बंदी घालण्याची मागणी
पनवेल (Panvel) महापालिका हद्दीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने भाजप आमदार प्रशांत ठाकूर (Prashant Thakur) यांनी सिडको (CIDCO) आणि पालिकेकडे एक मोठी मागणी केली आहे. 'लोकांना पाणी मिळत नसल्यामुळे पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये,' असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे. एकीकडे नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसताना, दुसरीकडे बांधकाम साइटवर पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खारघर (Kharghar) आणि तळोजा (Taloja) सारख्या परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, सिडको विविध स्रोतांकडून जसे की नवी मुंबई पालिका (Navi Mumbai Municipal Corporation) आणि एमआयडीसीकडून (MIDC) पाणी घेऊनही तुटवडा कायम आहे. जोपर्यंत रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत नवीन बांधकामे थांबवावीत, अशी भूमिका ठाकूर यांनी घेतली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
करमणूक
भारत
Advertisement
Advertisement

















