(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmers Protest India: शेतकरी आंदोलनाच्या बाजूने ग्लोबल सेलिब्रिटी, पॉपस्टार रिहानानंतर ग्रेटा थनबर्गकडून शेतकऱ्यांचं समर्थन
गाझीपूर सीमेवर काटेरी तार बसवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरु आहे तिथे इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
Farmer Protest : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी सुमारे 70 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आता जागतिक सेलिब्रिटीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. रिहाना यांनी आपल्या ट्विटरवर शेतकरी चळवळीशी संबंधित बातम्या शेअर केल्या आणि लिहिले की आम्ही याबद्दल बोलत का नाही? त्याचबरोबर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी म्हटलं आहे की आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या निदर्शनात एकजूटीने उभे आहोत. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी आतापर्यंत काय म्हटले.
पॉप स्टार रिहाना काय बोलली?
खरं तर, कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने काल संध्याकाळी शेतकङऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली. ही बातमी शेतकऱ्यांच्या निदर्शनाच्या जागेभोवती इंटरनेट बंद करण्याविषयी होती. रिहानाने ही बातमी शेअर केली आणि लिहिले की, "आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest या हॅशटॅगसह हे ट्वीट केले."
why aren’t we talking about this?! #FarmersProtest https://t.co/obmIlXhK9S
— Rihanna (@rihanna) February 2, 2021
ग्रेटा थनबर्ग काय म्हणाली?
रिहानाच्या ट्वीटनंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केले. ग्रेटा यांनी ट्विटरवर लिहिले की, “आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत." ग्रेटा थनबर्गला 2019 मध्ये अमेरिकन मॅगझिन टाईम्सने 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून घोषित केले होते. ग्रेटा चर्चेत आली होती ज्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ग्रेटाचा शाब्दिक चकमक झाली होती.
We stand in solidarity with the #FarmersProtest in India. https://t.co/tqvR0oHgo0
— Greta Thunberg (@GretaThunberg) February 2, 2021
पॉपस्टार रिहानाच्या ट्वीटवर भडकली कंगना
कंगनाने ट्वीट केले, "या विषयावर कोणी बोलत नाही कारण आंदोलन करणारे शेतकरी नसून आतंकवादी आहे. जे भारताच्या एकतेला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे चीन आपल्या देशावर हल्ला करेल आणि अमेरिकेसारखी चायनीज कॉलनी बनवेल. शांत रहा आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही जो आपला देश विकू"No one is talking about it because they are not farmers they are terrorists who are trying to divide India, so that China can take over our vulnerable broken nation and make it a Chinese colony much like USA... Sit down you fool, we are not selling our nation like you dummies. https://t.co/OIAD5Pa61a
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 2, 2021
दिल्लीच्या सिंधू, टिकरी आणि गाजीपूर या तीन सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. याठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त वाढवला आहे. टिकरी सीमेवर रस्त्यावर मोठे खिळे पसरल्यानंतर प्रशासनाने सिंघू सीमेवर सिमेंटच्या सहाय्याने बॅरिकेट्स जोडून भिंत तयार केली आहे. गाझीपूर सीमेवर काटेरी तार बसवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरु आहे तिथे इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या