एक्स्प्लोर
Black Diwali : बेरोजगार तरुणांची काळी दिवाळी, ठाण्यात आंदोलन
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी योजनेतील (Mukhya Mantri Yuva Karyaprashikshan Yojana) हजारो प्रशिक्षित बेरोजगारांनी कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी ठाण्यात (Thane) राज्य सरकारविरोधात (Maharashtra Government) मोठे आंदोलन छेडले आहे. 'आम्ही यंदाची दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करू,' असा थेट इशारा आंदोलनाचे नेते बालाजी पाटील-चाकूरकर (Balaji Patil-Chakurkar) यांनी दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 'लाडके भाऊ-बहीण' योजना जाहीर करून शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते, पण ते पूर्ण न झाल्याने युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. 'चला मामाच्या गावाला जाऊया आणि हक्काचा रोजगार मिळवूया' या ब्रीदवाक्याखाली राज्यातील ३६ जिल्ह्यांतील तरुण-तरुणी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले आहेत. प्रशिक्षण पूर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने आणि प्रमाणपत्रांना शासकीय किंवा खाजगी मान्यता नसल्याने हे तरुण हवालदिल झाले आहेत. सरकारने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
विश्व
पालघर
Advertisement
Advertisement


















