एक्स्प्लोर
Advertisement
आरबीआय लवकरच 200 रुपयांची नोट आणणार?
मुंबई : 2000 रुपयांच्या नोटांनंतर आता लवकरच 200 रुपयांची नोट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टरनी 200 रुपयांच्या नोटा छापण्याच्या प्रस्तावाला परवानगी दिली आहे.
200 रुपयांच्या नोटमध्ये नवे सुरक्षा मानाकंन असेल, जेणेकरुन त्याची कॉपी करणं शक्य होणार नाही. यंदा जून महिन्यानंतर 200 रुपयांची नवी नोट चलनात येण्याची शक्यता आहे.
आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांच्या पगारात घसघशीत वाढ
'200 रुपयांची नोट छापण्याची तयारी सुरु आहे. पण केंद्र सरकार जोपर्यंत आदेश देत नाही, तोपर्यंत नोटा छापण्याचं काम सुरु होणार नाही. सरकारच्या आदेशानंतरच 200च्या नव्या नोटा आणण्याच्या योजनेवर काम सुरु होईल,' असं रिझर्व्ह बँकेतर्फे सांगण्यात आलं आहे.
दुसरीकडे बनावट नोटांना लगाम लावण्यासाठी सरकार 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांच्या सुरक्षा फीचरमध्ये दर 3 ते 4 वर्षांनी बदल करण्याच्या विचारात आहे.
500-2000 च्या नोटांच्या सुरक्षा फीचरमध्ये दर 3 ते 4 वर्षांनी बदल
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर, 500 रुपयाची नवी नोट जारी करण्यात आली होती. तर 2000 रुपयांची चलनात आणली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement