एक्स्प्लोर

500-1000 च्या जुन्या नोटाबदलीसाठी RBI कडून 'सेकंड चान्स' ?

नवी दिल्ली : 8 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी आणखी एक मुदत मिळण्याची शक्यता आहे. 'हिंदुस्थान टाइम्स' या वृत्तपत्रात रिझर्व बँकेच्या सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. मात्र रद्द करण्यात आलेल्या नोटा स्वीकारण्यासाठी ही अत्यंत मर्यादित मुदत असेल तसंच त्यादरम्यान स्वीकारली जाणारी रक्कमही अत्यल्प असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या 50 दिवसात जुन्या, रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत होती. या काळात अनेकांनी रांगा लावून बँकांमध्ये जुन्या नोटा जमा केल्या. त्यानंतरही ज्यांच्याकडे जुन्या नोटा शिल्लक आहेत, त्यांना रिझर्व बँकेत योग्य आणि समर्पक कारण देऊन जुन्या नोटा जमा करण्याची मुभा आहे. 1 जानेवारीपासून 31 मार्चपर्यंतची मुदत ही प्रामुख्याने एनआरआय किंवा नोटाबदलीच्या 50 दिवसांत देशाबाहेर असलेल्या नागरिकांसाठी आहे. नोटा बदलण्याची किंवा जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत संपल्यानंतरही अनेकांकडे काही प्रमाणात जुन्या नोटा शिल्लक आहेत. त्यापैकी अनेकांनी रिझर्व बँकेला पत्र आणि मेलद्वारे त्यांची गाऱ्हाणी मांडलीत. काही जणांना अचानक जुन्या पोथ्या किंवा पुस्तकात ठेवलेली हजार किंवा पाचशेची नोट आढळून आली, तर काहींना कुठल्याशा डब्यात किंवा अन्यत्र दडवून ठेवलेले पैसे सापडले. त्यामुळे हे पैसे नियमित उत्पन्नातले असूनही सध्या बँकेत भरता येत नाहीत, म्हणून आणखी एक अल्पमुदतीची संधी देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यावरच रिझर्व बँकेकडून सकारात्मक प्रतिसाद येण्याची शक्यता आहे. मात्र या वेळी जुन्या नोटांमधील फक्त दोन हजार रुपयेच एका व्यक्तीला बँकेत भरण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजून काहीही निश्चित असं धोरण स्पष्ट झालेलं नाही. जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी मिळणार असलेल्या या संधीचा गैरवापर होऊ नये म्हणून अत्यल्प प्रमाणात जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget