(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ration Card : रेशनकार्ड धारकांना मिळणार स्वस्त पेट्रोल; 'या' राज्याने सुरू केली योजना
देशातील अनेक राज्यांमध्ये रेशनकार्डवर विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आज झारखंड सरकारने राज्यातील सुमारे 20 लाख लोकांना रेशन कार्डवर स्वस्त पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे.
Ration Card : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने रेशनकार्डवर सर्वसामान्य, गरीब व गरजूंना अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. आजपासून रेशनकार्ड धारकांना स्वस्त पेट्रोलची सुविधा मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आजपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
देशातील अनेक राज्यांमध्ये रेशनकार्डवर विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आज झारखंड सरकारने राज्यातील सुमारे 20 लाख लोकांना रेशन कार्डवर स्वस्त पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ही विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे.
20 लाख लोकांना मिळणार लाभ
झारखंड राज्यात सरकारने पेट्रोल सबसिडी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ रेशनकार्ड असणाऱ्या सर्वांना मिळणार आहे. झारखंडमधील सुमारे 20 लाख लोकांना पहिल्या टप्प्यात या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कोणाला मिळणार लाभ?
ज्यांच्याकडे लाल, पिवळे आणि हिरवे रेशनकार्ड आहे, अशांना पेट्रोल सबसिडी योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय ज्यांच्याकडे झारखंड राज्य नोंदणीचे दुचाकी वाहन आहे ते लोक या याजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. दर महिन्याला या योजनेच्या लाभाचे 250 रुपये थेट बँक खात्यात जमा होतील.
25 रूपये सबसिडी
पेट्रोल सबसिडी योजनेंतर्गत प्रत्येक सदस्याला महिन्याला दहा लिटर पेट्रोलवर 25 रुपये सबसिडी दिली जाणार आहे. अशा प्रकारे, प्रत्येक महिन्याला 250 रुपये थेट लाभधारकाच्या खात्यात जमा होतील. पेट्रोल खरेदी करताना पंपावर पूर्ण रक्कम भरावी लागेल आणि महिन्याच्या शेवटी लाभधारकाच्या खात्यात 250 रुपये जमा केले जातील. नागरिकांकडून झारखंड सरकारच्या या निर्ययाचं स्वागत होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- CM Uddhav Thackeray: शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी; वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
- Republic Day : ऐतिहासिक क्षण; स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमधील 'क्लॉक टॉवर'वर तिरंगा फडकला
-
महाराष्ट्राकडून महिलांच्या सुरक्षेचा आदर्श घालून दिला जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे