Ramadan 2022 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
Ramadan 2022 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना रमजानचा आज पहिला दिवस म्हणजेच पहिला उपवास आहे.
Ramadan 2022 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना रमजानचा आज पहिला दिवस म्हणजेच पहिला उपवास आहे. रविवारी चंद्र दिसल्यानंतर रमजानच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास करतात. महिनाभर उपवास केल्यानंतर, ईदचा चंद्र पाहिल्यानंतर पुरुष आणि मुले ईदगाहमध्ये आणि महिला घरांमध्ये ईदची नमाज अदा करतात.
पवित्र महिन्याचा चंद्र पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून रमजान महिन्याला सुरुवाती झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी ट्विट केले की, 'हा पवित्र महिना लोकांना गरीबांची सेवा करण्याची प्रेरणा देईल. यामुळे आपल्या समाजात शांतता, सौहार्द आणि करुणेची भावना अधिक वाढण्यास मदत होईल.'
Greetings on the commencement of Ramzan. pic.twitter.com/Q5YaWzaz38
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2022
रमजान महिन्याचे महत्त्व
रमजानचा महिना इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम लोक सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अन्न आणि पाणी घेत नाहीत. उपवास करण्यासोबतच या संपूर्ण महिन्यात आपले विचारही शुद्धता ठेवावे लागतात. आपल्या शब्दांनी कोणाचेही नुकसान न होणार नाही हेही आवश्यक असते. हा महिनाभर शरीराच्या शुद्धतेसाठी विशेष काळजी घेतली जाते.
रमजान महिन्यात उपवास का केला जातो?
रमजान हा महिन्यामध्ये इस्लाम धर्माचे पवित्र प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या समक्ष पवित्र ग्रंथ कुराणचा पहिला श्लोक मुस्लिमांच्या अनावरण करण्यात आला होता. तेव्हापासून इस्लाममध्ये हा महिना पवित्र मानून महिनाभर उपवास करण्याची परंपरा सुरू झाली.
उपवास हे इस्लाम धर्माच्या पाच मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे. उपवास, नमाज, दान, श्रद्धा आणि मक्काची हज यात्रा ही इस्लाम धर्मातील पाच तत्त्वे आहेत. मुस्लिम बांधवाच्या जीवनात या पाच तत्त्वांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Temperature Rise : मार्च महिना ठरला सर्वात उष्ण महिना, 122 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद
- Twitter : आता ट्विट 'एडिट' करता येणार? ट्विटरचं नवीन फिचर की 'एप्रिल फुल'; यूजर्स गोंधळात
- Viral Video : फ्रीजमधून केलेली चोरी पकडल्यावर थरथर कापू लागला कुत्रा, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha