Viral Video : फ्रीजमधून केलेली चोरी पकडल्यावर थरथर कापू लागला कुत्रा, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये मालकाने कुत्र्याची चोरा पकडल्यानंतर कुत्रा थरथर कापत असल्याचं दिसतंय.
Viral Video : आजकाल पाळीव प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. पाळीव प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ आणि त्यांचे निष्पाप कृत्ये सर्वांनाच पाहायला आवडतात. पाळीव प्राण्यांचे मजेदार व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या बहुतांश कुत्रा आणि मांजरीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
अनेकदा मालक घरी नसताना कुत्रे घरात गोंधळ घालतात आणि सर्व वस्तू इकडे तिकडे फेकतात किंवा खाद्यपदार्थ चोरतात असे दिसून येते. चूक केल्यावर शिक्षेच्या भीतीने कुत्रे पश्चातापही करतात, असे अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे त्यांची चोरी स्पष्ट होते. सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन पाळीव कुत्र्यांच्या मस्ती संबंधित आहे.
View this post on Instagram
अलीकडे असाच एक कुत्रा व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये, एक माणूस उघड्या फ्रिजजवळ उभ्या असलेल्या एका कुत्र्याला खाल्लेले अन्नपदार्थाचे पाकीट दाखवून प्रश्न करतो. ज्यावर तो हावभावात दुसऱ्या कुत्र्याकडे इशारा करतो.
त्यानंतर मालकाने दुसऱ्या कुत्र्याकडे पाहताच तो कुत्रा भीतीने थरथर कापू लागतो. ज्यावरून त्याने फ्रीजर उघडून चोरून अन्नपदार्थ खाल्ल्याचे स्पष्ट होते. कुत्र्याची चोरी मालकाच्या लक्षात आल्यानंतर शिक्षेच्या भीतीने तो थरथर कापताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ पाहून नेटकरी हसण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. यूजर्स आपल्या मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Supreme Court : अबब! केंद्र आणि राज्य सरकारांशी संबंधित 35000 हून अधिक प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित
- Odisha : प्रेमीयुगुलाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या डिलीव्हरी बॉयची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
- Viral Video : समुद्रात पोहताना महिलेच्या कानात शिरला खेकडा, पुढे काय झालं पाहा; व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha