एक्स्प्लोर
2019 च्या निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्त्वात लढणार : शिंदे
राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतलाअसून यंदाच्या दिवाळीचं हे समस्त काँग्रेसजनांना गिफ्ट असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका या राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येतील, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना डॉ. मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी शिंदे बोलत होते.
राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनवण्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी घेतलाअसून यंदाच्या दिवाळीचं हे समस्त काँग्रेसजनांना गिफ्ट असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे.
अगदी दोन-तीन दिवसांपूर्वीच म्हणजे 11 ऑक्टोबरलाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबईतील बैठतीत ठराव मंजूर केला होता, ज्यामध्ये राहुल गांधींकडे काँग्रेसचं अध्यक्षपद देण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र काँग्रेसने एकमताने हा ठराव मंजूर केला होता.
राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्ष पद देऊन देशभरातील काँग्रेस नेत्यांची इच्छा कधी पूर्ण होऊन, राहुल गांधी कधी पक्षाची धुरा खांद्यावर घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, सध्या राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये प्रचाराचा धुरळा उडवला आहे. गुजरातमध्ये प्रचारसभांच्या माध्यमातून तळागाळात पोहोचण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. त्यांनी तिथे कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे पक्षाध्यक्ष देण्यात येतंय का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement