एक्स्प्लोर

Rahul Gandhi | सरकारने पॅकेजचा पुनर्विचार करावा, शेतकरी, मजुरांच्या खिशात पैसे द्यावेत : राहुल गांधी

काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी मागणी आणि पुरवठ्याचं गणित सुधारण्यासाठी पैसे देणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. सावधगिरीनं लॉकडाऊन शिथिल करण्याची गरज आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : सरकारनं रेटिंग्स तसंच जगातील प्रतिमेचा विचार आज या काळात करु नये. देशातील शेतकरी, मजूर, महिला, तरुण देशाचं रेटिंग्स बनवतात. लोकांच्या खिशात पैसा नसेल तर लोकं काय खाणार? असा सवाल करत शेतकरी, मजुरांना खिशात पैसे द्यावेत अशी मागणी काॅंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. आज त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मागणी आणि पुरवठ्याचं गणित सुधारण्यासाठी पैसे देणं गरजेचं आहे. हे पैसे राज्य सरकार अथवा केंद्र सरकारमार्फत द्या किंवा कसेही द्या पण पैसे द्या, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. तसंच सावधगिरीनं लॉकडाऊन शिथिल करण्याची गरज आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी, मजुरांनी हा देश उभा केला आहे. या काळात त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शेतकरी, मजुर, कष्टकरी हा अर्थकारणाचा पाया आहे. त्यांना सरकारने मदत करायलाच हवी. नुसतं पॅकेज जाहीर करून चाणार नाही तर त्यांच्या खिशात पैसे जायला हवेत, असं ते म्हणाले. लोकांच्या खिशात जर पैसे नसतील तर लोक काय खाणार? असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारने सावकाराचं काम करू नये, अशी टीका केली आहे.

ते म्हणाले की, भारताच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगची काळजी करु नका, ते रेटिंग नंतर सुधारु शकेल. सध्या भारताच्या मजूर, शेतकऱ्यांच्या काळजीचा विषय आहे. ते सध्या संकटात आहेत, त्यांना आधार द्या, रेटिंग आपोआप सुधारेल, असं राहुल गांधी म्हणाले.

लॉकडाऊनसंदर्भात राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाउन हा काही इव्हेंट नाही तर ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेताना विशेष काळजी घेऊन योग्य त्या रणनितीनुसारच पुढेही निर्णय घ्यावा लागेल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे. लॉकडाऊन जास्त दिवस ठेऊन चालणार नाही. सावधगिरीने लॉकडाऊन शिथील करण्याची गरज असल्याचं राहुल गांधी म्हणाले.

VIDEO | काय म्हणाले राहुल गांधी, पाहा संपूर्ण व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lakshman Hake: 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
Pune Crime : बारामतीमधील खून प्रकरणानंतर गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lakshman Hake: 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
Pune Crime : बारामतीमधील खून प्रकरणानंतर गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Embed widget