एक्स्प्लोर
देशभरात शिवजयंतीचा उत्साह, राहुल गांधींचं मराठीतून ट्वीट, शिवरायांना अभिवादन
राहुल गांधी यांनी मराठीत ट्वीट करुन शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे.
मुंबई : आज देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवजयंतीनिमित्त ट्वीट करुन शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे.
शिवजयंतीनिमित्त आज राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवरायांना विविध माध्यमातून अभिवादन केलं जात आहे. यात राहुल गांधी यांनी गमराठीत ट्वीट करुन शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आहे.
राहुल गांधींचं ट्वीट
छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #शिवाजीमहाराजकिजय
https://twitter.com/RahulGandhi/status/1097725879990521856
राज्यभरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्यातच सांगलीत तब्बल सव्वा लाख चौरस फुटाची शिवराज्याभिषेकाची विश्वविक्रमी रांगोळी काढण्यात आली आहे. ही रांगोळी सांगली जिल्ह्यातील तब्बल 100 कलाशिक्षकांनी साकारली आहे. सांगली शहरातील शिवाजी स्टेडियममध्ये ही विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement