एक्स्प्लोर
राधे माँ पुन्हा बेभान,भक्तांसमोर डान्स, भक्तांनी नोटा उधळल्या
उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राधे माँ तिच्या भक्तांसमोर बेभान होऊन नाचली.

लखनऊ: नौटंकीची महागुरु राधे माँनं पुन्हा एकदा ठुमके लगावले. उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राधे माँ तिच्या भक्तांसमोर बेभान होऊन नाचली. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये कल्की उत्सवात, राधे माँ भक्ती गीतावर नाचत होती. यावेळी अनेक भक्तांनी तिच्याभोवती गराडा घातला होता. राधे माँ नाचत नाचतच देवीच्या रुपात भक्तांना आशिर्वाद देत होती. महत्त्वाचं म्हणजे भक्तांनीही राधे माँवर पुष्पवृष्टी केलीच, शिवाय नोटांचाही पाऊस पाडला.
आचार्य प्रमोद कृष्ण हे संभलमध्ये कल्की उत्सव करतात. यासाठी अनेक साधूसंतांना आमंत्रित केलं जातं. यावेळी राधे माँही उपस्थित होती.
आचार्य प्रमोद कृष्ण हे संभलमध्ये कल्की उत्सव करतात. यासाठी अनेक साधूसंतांना आमंत्रित केलं जातं. यावेळी राधे माँही उपस्थित होती. VIDEO : मी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होते : राधे माँ
दरम्यान, राधे माँने काही दिवसांपूर्वीच एबीपी माझाला खास मुलाखत दिली होती. यात तिने अनेक गौप्यस्फोट केले होते. आपले मानसिक संतुलन ढळल्यामुळे आपण मानसोपचाराकडून उपचार घेत आहे असं राधे माँ म्हणाली होती.
संबंधित बातम्याVIDEO : मी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होते : राधे माँ
अधिकाऱ्याच्या खुर्चीत राधे माँ, पोलिस स्टेशनमध्ये VIP ट्रीटमेंट
राधे माँ सनी लिओनीची फॅन, तिच्या आयपॅडमध्ये पॉर्न व्हिडीओ : डॉली बिंद्रा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























